शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुलेखा कुंभारे यांचा भाजपाला पाठिंबा

By admin | Updated: September 29, 2014 01:01 IST

एरव्ही काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन चालण्याच्या नारा देते, पण निवडणुकींच्या वेळी मात्र स्वत:चे उमेदवार दुसऱ्यांवर लादतात. आपल्याला पाच जागा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते

नागपूर : एरव्ही काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन चालण्याच्या नारा देते, पण निवडणुकींच्या वेळी मात्र स्वत:चे उमेदवार दुसऱ्यांवर लादतात. आपल्याला पाच जागा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, शब्द न पाळणाऱ्या कॉंग्रेसने अखेरच्या क्षणी विश्वासघात केला, असा आरोप करीत माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली. रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. कुंभारे म्हणाल्या, गेल्या निवडणुकीत ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ ने काँग्रेसला सहकार्य केले. या वेळी आम्ही ५ जागांची मागणी काँग्रेसकडे केली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीला सकारात्मक आश्वासने दिली. उमरेड आणि कामठी मतदारसंघ ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ ला देण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु अखेरच्या क्षणी काँग्रेसने विश्वासघात करीत संजय मेश्राम आणि राजेंद्र मुळक यांना उमेदवारी दिली. गरजेच्या वेळी मदत घेऊन नंतर धोका देणे ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा केल्यानंतर आम्ही भाजपा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. वेगळ््या विदर्भाबाबत भाजप योग्य भूमिका घेईल, असा ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कुठलीही अट नाही‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ पूर्णपणे आमच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे भाजपाला समर्थन देत असताना कुठलीही अट टाकलेली नाही अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. गडकरी आणि माझी मैत्री राजकारणापलिकडची असून ते माझे मोठे भाऊच आहेत, अशा भावना सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केल्या