शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

सुखविंदर सिंहने दिली संजय दत्तला 'जादू की झप्‍पी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 22:04 IST

Nagpur News सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी मुन्‍नाभाई संजय दत्‍तला 'जादू की झप्‍पी' देऊन साहित्‍य, संस्‍कृती आणि कलेचा संगम असलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला शानदार सुरुवात केली.

ठळक मुद्देसाहित्‍य, कला, संस्‍कृती आणि प्रेमाच्‍या खासदार महोत्‍सवाचा शानदार प्रारंभ 

सुरभी शिरपूरकर

नागपूरः 'मुन्‍नाभाई एमबीबीएस' मधील मुन्‍नाभाईच्‍या 'जादू की झप्‍पी' ने एकेकाळी खूपच माहोल केला होता. सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी मुन्‍नाभाई संजय दत्‍तला हीच 'जादू की झप्‍पी' देऊन साहित्‍य, संस्‍कृती आणि कलेचा संगम असलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाला शानदार सुरुवात केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व इतर मान्‍यवरांनाही सुखविंदर सिंह यांनी 'प्‍यार की झप्‍पी' दिली आणि 'जिनके सर हो इश्‍क की छॉंव ..... चल छैय्या छैय्या' या गीताच्‍या माध्‍यमातून नागपूरकरांवर प्रेमाचा वर्षाव केला.  

केंद्रीय मंत्री यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्कृतिक महोत्सव - 2021 चे शुक्रवारी शानदार उद्घाटन झाले. महोत्‍सवाचे हे चौथे वर्ष आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू झालेल्‍या या महोत्‍सवाला 'मुन्‍नाभाई' फेम बॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांच्‍या हस्‍ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मा.  नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्‍यक्ष मा. प्रा. अनिल सोले, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार  दत्‍ता मेघे, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्‍यासह आमदार, माजी आमदार व आयोजन समितीचे सदस्‍य उपस्‍थ‍ित होते.

सुखविंदर सिंह यांनी होले होल या गीताच्‍या सुरावटीवर मंचावर आगमन केले. रमता जोगी, धान ता धान, मरजानी, बिडी जलायले, बनठन चली, जयो हो अशी गाणी सादर करून नागपूरकरांना खुष केले. 

याप्रसंगी बोलताना, नितीन गडकरी म्‍हणाले, कोरोनाचा दोन वर्षाचा काळ कठीण होता. अनेक आप्‍तजनांना मुकलो. देवाच्‍या आशीर्वादाने आपण त्‍यातून बाहेर निघालो. त्‍यामुळे नियमांचे पालन करायचे आहे. साहित्‍य, संस्‍कृती, कला, इतिहास ही आपल्‍या समाजाचा ताकद असून ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ही शक्‍ती आहे. पण केवळ शक्‍तीच्‍या भरोशावर समाजाला पुढे नेत असताना साहित्‍य, संस्‍कृतीला विसरू शकत नाही. कलाकारांना सन्‍मान व्‍हावा, नवीन पिढीपर्यंत हे संस्‍कार पोहोचावे म्‍हणून आहे हा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव सुरू केला. 

नितीन गडकरी यांनी संजय दत्‍त यांचे वडील सुनील दत्‍त यांच्‍या मैत्रीचा उल्‍लेख करताना संजय दत्‍त यांनी अनेक संकटांचा सामना केला पण आपली माणुसकी सोडली नाही, असे सांगितले. सुनील व नर्गिस दत्‍त यांचे चित्रपट सृष्‍टीत मोठे योगदान असल्‍याचे सांगितले. विधान परिषदेच्‍या निवडणुकीत विजयी झाल्‍याबद्दल वसंत खंडेलवाल व चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. साची अरमरकर या मुलीने संजय दत्‍त यांचे केलेले पोर्टेट त्‍यांना भेट दिले. प्रास्‍ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.साहित्‍य, कला, संस्‍कृती चा महायज्ञ - नितीन गडकरी साहित्‍य, संस्‍कृती, कला हे समाज संस्‍कार, समाज प्रबोधनाचे साधन आहे. त्‍यातून आपल्‍या चांगले काम करण्‍याची प्रेरणा मिळते. खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव हा साहित्‍य, संस्‍कृती व कलेचा हा यज्ञ आहे. आपण त्‍यात सहभागी होऊन आहुती देतो आहोत. हा महोत्‍सव लोकांना प्रेरणा देईल, भावी पिढीला संस्‍कार देईल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला. सांस्‍कृतिक महोत्‍सव केवळ नागपुरापर्यंत मर्यादित न राहता तालुका स्‍तरावर पोहोचावा, त्‍यासाठी सर्वप्रकारचे सहाय्य केले जाईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले. 

कैसे हो मामू...'मुन्‍नाभाई', 'संजु' अशा अनेक चित्रपटामधून आपल्‍या अभिनयाने लोकप्रियतेचा शिखर गाठलेले सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्‍त यांनी 'कैसे हो मामू...' अशा शब्‍दात नागपूरकर रसिकांची चौकशी केली आणि आपल्‍या खास दमदार शैलीतील डॉयलॉगबाजीने रसिकांची मने जिंकली. देशासाठी, लोकांसाठी आणि विकासासाठी काम करणारे वडील संजय दत्‍त यांच्‍यानंतरचे नितीन गडकरी हे दुसरे नेते मी पाहिले. नितीनजी माझे मोठे भाऊ आहे. त्‍यांच्‍यासाठी माझी 'जान हाजिर है' असे सांगताना संजय दत्‍त यांनी 'मुन्‍नाभाई' चा तिसरा पार्ट लवकरच काढला जावा आणि त्‍यासाठी नागपूरकरांनी राजू हिरानी यांना गळ घालावी, अशी विनंती केली. येरवडा तुरुंगात असताना तेथील हवालदारांनी मराठी शिकवायचे खूप प्रयत्‍न केले पण मी शिकू शकलो नाही, अशी कबूली देताना संजय दत्‍त्‍र यांनी आपल्‍याला भाषण देत नाही. त्‍यामुळे केवळ डायलॉगच म्‍हणणार आहे, असे उत्‍तरप्रदेशचा एक किस्‍सा सांगत सांगितले. 'संजू' चित्रपटातल्‍या इतर सर्व गोष्‍टी विसरून जा. आईवडिल आणि मोठ्यांचा सन्‍मान कसा करायचा, हाच धडा घ्‍या, असे आवाहन त्‍यांनी युवकांना केले. 

टॅग्स :Sanjay Duttसंजय दत्त