शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

खादीच्या वस्त्रांवर सूट योजना : खा. विजय दर्डा यांच्या हस्ते गांधी जयंतीनिमित्त शुभारंभ

By admin | Updated: October 3, 2014 02:49 IST

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा यांनी खादीच्या वस्त्रांवर सूट देणाऱ्या योजनेचा शुभारंभ आज गुरुवारी केला.

नागपूर : खादी केवळ वस्त्र नाही आणि या वस्त्रांचा व्यवसायही नाही. खादी हा स्वदेशीचा, परंपरेचा आणि देशाभिमानाचा एक विचार आहे. नागरिकांना स्वाभिमानाने जगणे शिकविणारा आणि भारतीय संस्कृती, अध्यात्माचा संदर्भ खादी वस्त्रांशी जुळला आहे, असा विचार व्यक्त करीत लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा यांनी खादीच्या वस्त्रांवर सूट देणाऱ्या योजनेचा शुभारंभ आज गुरुवारी केला. हा कार्यक्रम खादी ग्रामोद्योग भांडार, सीताबर्डी येथे पार पडला. म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त खादी ग्रामोद्योग भांडार, सीताबर्डीच्यावतीने या योजनेला आज प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी खा. विजय दर्डा यांनी म. गांधी यांच्या पुतळ्याला वंदन करून पुष्प अर्पण केले. याप्रसंगी त्यांनी विविध प्रदेशांत तयार करण्यात येणाऱ्या खादीच्या वेगवेगळ्या वस्त्रप्रावरणांची माहिती घेतली. खादीचे वस्त्र तयार करण्यात झालेले बदलही त्यांनी समजून घेतले. याप्रसंगी त्यांनी काही खादीचे वस्त्र खरेदी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामोद्योग आयोगाचे संचालक राहुल गजभिये, भांडारचे व्यवस्थापक बबनराव पडोलिया, संस्थेचे उपाध्यक्ष मधुकररावजी चामंतलवार आणि संस्थेचे इतर पदाधिकारी तसेच खादीप्रेमी नागरिक उपस्थित होते.बर्डी येथील या खादी ग्रामोद्योग भांडारच्या इमारतीचे आणि भांडारचे उद्घाटन २३ फेब्रुवारी १९३५ साली म. गांधी यांच्या हस्तेच करण्यात आले होते. आजही हे भांडार त्याच स्थळी कायम आहे. सकाळी ११ वाजता म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि खादीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने एक रॅली काढण्यात आली.या रॅलीत भांडारच्या कार्यकर्त्यांसह शेकडो खादीप्रेमी नागरिक सहभागी झाले. खादी ग्रामोद्योग भांडार, बर्डी येथून या रॅलीला बबनराव पडोलिया यांच्या मार्गदर्शनात प्रारंभ करण्यात आला. झाशी राणी चौक, मुंजे चौकमार्गे व्हेरायटी चौक येथील म. गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ही रॅली विसर्जित करण्यात आली. म. गांधींच्या विचाराचा प्रचार नव्या पिढीपर्यंत व्हावा म्हणून ही रॅली काढण्यात आली. खादीवर पुढील ४५ दिवस सूट देण्यात येणार असून खादीप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)