शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीच्या विलंबामुळे खटला निरर्थक होत नाही; उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:06 IST

विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खटला निरर्थक ठरवून त्याला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राकेश घानोडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विलंबाने एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खटला निरर्थक ठरवून त्याला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी नुकताच एका प्रकरणात देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची शिक्षा कायम ठेवली.पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास विलंब झाल्यामुळे संपूर्ण खटला अविश्वसनीय ठरवून फेटाळण्यात यावा, अशी विनंती आरोपीच्या वकिलाने न्यायालयाला केली होती. न्यायालयाने हा युक्तिवाद खोडून काढला. एफआयआर नोंदविण्यास विलंब झाल्यामुळे संपूर्ण खटला प्रारंभालाच कचरापेटीत फेकून दिला जाऊ शकत नाही. अशा प्रकरणामध्ये आरोपीला फसविण्यासाठी जाणिवपूर्वक एफआयआर नोंदविण्यास विलंब करण्यात आला काय? हे न्यायालयाला तपासून पाहावे लागते, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.सदर प्रकरणात एफआयआर नोंदविण्यासाठी जाणिवपूर्वक विलंब करण्यात आला नाही, असा निष्कर्ष निर्णयात नोंदविण्यात आला. आरोपीने २३ व २४ आॅगस्ट २०१५ रोजी पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला पहिल्यांदा २६ आॅगस्ट रोजी गुप्तांगात त्रास व्हायला लागला. त्यामुळे तिने मध्यरात्री १२ वाजता आईला आरोपीच्या निंदनीय कृत्याची माहिती दिली.परिणामी, आईने २७ आॅगस्ट रोजी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला, असे उच्च न्यायालयाने आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद फेटाळताना सांगितले.

असे आहे प्रकरणसमाधान काशीराम खिरोडकर (३९) असे आरोपीचे नाव असून, तो जळगाव जामोद (बुलडाणा) तालुक्यातील रहिवासी आहे. घटनेच्या वेळी पीडित मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची होती. ती इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील खारीज करून आरोपीला दणका दिला. आरोपीचे कृत्य निंदनीय असल्याचे मत निर्णयात नमूद करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय