खापरखेडा : घरासमाेर असलेल्या नर्सरीतील सिसमच्या झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर वाॅर्ड क्र. ६ येथे बुधवारी (दि. २८) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
जय ऊर्फ छाेटू सुरेश बेहार (वय १९, रा. वाॅर्ड क्र. ६, चनकापूर) असे मृताचे नाव असून, त्याला दारूचे व्यसन हाेते. घटनेच्या दिवशी ताे दारूच्या नशेत काहीही न सांगता घरून निघून गेला. त्याची आई शांता सुरेश बेहार यांनी जयचा शाेध घेतला असता, ताे कुठेही आढळून आला नाही. दरम्यान, घरासमाेरील नर्सरीमध्ये सिसमच्या झाडाखाली गळफास घेऊन ताे मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणी शांता सुरेश बेहार (४०, रा. वाॅर्ड क्र. ६, चनकापूर) यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस हवालदार सूर्यभान जळते करीत आहेत.