शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST

नागपूर : झेंडा चौक, संगम रोड वानाडोंगरी येथील रहिवासी अक्षय पुरुषोत्तम डाखळे (वय २७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नागपूर : झेंडा चौक, संगम रोड वानाडोंगरी येथील रहिवासी अक्षय पुरुषोत्तम डाखळे (वय २७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्यामलाल मोरेश्वर डाखळे यांनी दिलेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

अशाच प्रकारे अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दीनगरात राहणारे राजू बाबू अहिरराव (वय ४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अहिरराव मूळचे मध्य प्रदेशातील शिवनीचे रहिवासी होते. ते रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात राहत होते. साईनाथ शीतलाप्रसाद शर्मा यांनी दिलेल्या माहितीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

तलावात मृतदेह आढळला

नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीसागर तलावात अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला. रविवारी सकाळी मिळालेल्या माहितीवरून गणेशपेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत महिलेची ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.

---

भिंतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील युनिव्हर्सिटीच्या भिंतीवर चढलेल्या तरुणाचा खाली पडून मृत्यू झाला. लखन लेखराम मारकंडे (वय १९) असे त्याचे नाव आहे. लखन २५ मेच्या सकाळी युनिव्हर्सिटीच्या भिंतीवर चढला होता. तोल जाऊन खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

क्वॉरंनटाईन सेंटरमधील साहित्याची चोरी

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याला लागून असलेल्या आणि पोलीस क्वार्टरमध्ये तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधील सीलिंग फॅन, एक्झॉस्ट फॅन आणि नळ चोरट्याने काढून नेले. रविवारी ही घटना उघडकीस आली. तेथे साफसफाई करणारे आशीनगर झोनचे जमादार संदीप शंकर समुद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

---

कुख्यात प्रवीण शाहू हद्दपार

नागपूर : कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा कुख्यात गुंड प्रवीण ऊर्फ अनुप सत्यनारायण शाहू (वय २२) याला पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी दोन वर्षांसाठी नागपुरातून हद्दपार केले. शाहू हा कुख्यात गुंड असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

---