शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : यशोधरानगरच्या विनोबा भावेनगरात बुधवारी सकाळी एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिवाकर प्रेमलाल कानमोडे असे ...

नागपूर : यशोधरानगरच्या विनोबा भावेनगरात बुधवारी सकाळी एका ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दिवाकर प्रेमलाल कानमोडे असे मृताचे नाव आहे. दिवाकर सकाळी ७.४५ वाजता घरातील बाथरुममध्ये हँगरला बांधलेल्या शर्टने गळफास घेतल्याचे दिसले. दिनेश कानमोडे यांच्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

.........

यशोधरानगरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

नागपूर : यशोधरानगर परिसरातून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. मंगळवारी २३ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ही अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी सर्वत्र तिचा शोध घेतला, परंतु तिचा पत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

.............

दुचाकी चोरट्यांना अटक

नागपूर : पाचपावली पोलिसांनी बुधवारी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना प्रोडक्शन वॉरंटवर अटक केली आहे. शुभम ऊर्फ शुटर श्यामराव नेवारे (२५) रा. भांडेप्लॉट, सेवादलनगर आणि स्वप्निल ऊर्फ मोनू भीमराव नाईक (३२), अशी आरोपींची नावे आहेत. तहसील पोलिसांनी आरोपींना २२ फेब्रुवारीला अटक केली होती. आरोपींनी पाचपावली आणि जरीपटका ठाण्यांतर्गत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यानुसार पाचपावली पोलिसांनी दोघांचा प्रोडक्शन वॉरंट मिळवून त्यांना तुरुंगातून ताब्यात घेतले. आरोपींकडून एक लाख रुपये किमतीची दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

................

कारच्या धडकेमुळे बाईकस्वाराचा मृत्यू

हिंगणामधील जामठा येथे अपघात

नागपूर : हिंगणा ठाण्यांतर्गत जामठा येथे एका भरधाव कारची धडक लागल्यामुळे बाईकवर असलेल्या युवकाचा मृत्यू झाला. वाहन चालक भान्या तुकाराम गावंडे (४०) जखमी आहे. सुनील गावंडे (२०) रा. सक्करदरा असे मृत झालेल्या बाईकस्वाराचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी २.३० वाजता घडली. फिर्यादी भान्या आपल्या बाईक क्रमांक एमएच ४९, बीएन-८८९५ वर सुनीलला बसवून जामठ्याला जात होते. जामठा येथील डिव्हायडरजवळ कार क्रमांक एमएच ४९, यू-२९५१ च्या आरोपी चालकाने बेजबाबदारपणे कार चालवून त्यांच्या बाईकला धडक दिली. यात भान्या जखमी झाले तर सुनीलचा मृत्यू झाला. संग्राम फिमारे यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...........