शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

नागपूर : कबाडीचा व्यवसाय करणारे बिहारी जगन्नाथ शाहू (वय ४५, रा. इरोस सोसायटी, गोरेवाडा) यांनी गळफास लावून आत्महत्या ...

नागपूर : कबाडीचा व्यवसाय करणारे बिहारी जगन्नाथ शाहू (वय ४५, रा. इरोस सोसायटी, गोरेवाडा) यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मीरा रामबिहारी शाहू (वय ४४) यांनी दिलेल्या माहितीवरून मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

नागपूर : मानकापूर परिसरातील ताजनगर झोपडपट्टीत राहणारे मनोज दर्शन ठाकूर (वय ३८) यांना रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा करुण अंत झाला. सोमवारी सकाळी मानकापूर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---

मामाने भाचीला केली मारहाण

नागपूर : फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्यास दिलेली रक्कम परत मागितली म्हणून मामाने भाचीला मारहाण करून तिचा विनयभंग केला. रविवारी दुपारी १ च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. फिर्यादी ३५ वर्षाची महिला असून, आरोपी संजय नथूराव रहाटे (वय ५५) तिचा नातेवाईक आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रहाटेविरुद्ध विनयभंग करून मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला.

----

मानकापूरमधील मुलगी बेपत्ता

नागपूर : मानकापुरात राहणारी १५ वर्षाची मुलगी रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. तिच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

----

तरुणावर चाकू हल्ला

नागपूर : घरासमोर मित्रांसोबत गप्पा करीत बसलेल्या राजू उर्फ चोखा गणेश शाहू (वय ३२) याच्यावर आरोपी राजेश मंगलू निषाद (वय २४) याने चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी राजेश निषादविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---