शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारी शेतकºयाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:14 IST

राष्टÑीयीकृत बँकेकडून घेतलेले तीन लाख रुपयांचे पीककर्ज आणि मागील दोन वर्षांपासून होणारी नापिकी, त्यातच वडिलांचे निधन, अशा विपरीत परिस्थितीत...

ठळक मुद्देखापा येथील घटना : गळफास लावून संपविली जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्ककामठी/कोराडी : राष्टÑीयीकृत बँकेकडून घेतलेले तीन लाख रुपयांचे पीककर्ज आणि मागील दोन वर्षांपासून होणारी नापिकी, त्यातच वडिलांचे निधन, अशा विपरीत परिस्थितीत कर्जपरतफेडीसोबतच शेती व घरखर्चाच्या चिंतेत शेतकºयाने त्याच्या राहत्या घरी छताला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा (पाटण) (ता. कामठी) येथे मंगळवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.मनोहर गणपतराव ठाकरे (४७, रा. खापा-पाटण, ता. कामठी) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. मनोहर ठाकरे यांच्याकडे खापा (पाटण) शिवारात ८.०२ हेक्टर (२०.०५ एकर) शेती आहे. यातील ३.९८ हेक्टर (९.९५ एकर) शेती ही मनोहर ठाकरे यांच्या नावे असून, उर्वरित शेती त्यांचे वडील गणपतराव ठाकरे यांच्या नावेआहे.विशेष म्हणजे, मनोहर हे गणपतराव यांचा एकुलता एक मुलगा होय. त्यांनी २०१५ मध्ये बँक आॅफ बडोदाच्या कोराडी शाखेकडून तीन लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पीक हाती न आल्याने त्यांना या कर्जाच्या परतफेडीची चिंता होती. मात्र, वडील हयात असल्याने त्यांना मानसिक आधार होता.दुर्दैवाने चार महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. शिवाय, त्यांनी यावर्षी शेतात लवकी आणि दोडक्यांची लागवड केली होती. प्रतिकूल वातावरणामुळे लवकी आणि दोडक्यांचे पीक नष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली, शिवाय त्यांनी कर्जमाफीचा अर्ज भरला होता. त्यांनी मंगळवारी शेतातील कापसाची वेचणी करून तो घरी आणला आणि खोलीत गंजी लावून ठेवला.रात्री सर्वांसोबत जेवण करून त्यांनी दोन्ही मुले पीयूष (१९) व सान्निध्य (१३) तसेच पत्नी लता (४०) झोपी गेले. मनोहर मात्र चिंता करीत खोलीतील कापसाच्या गंजीवर बसले होते. त्यातच त्यांनी छताला गळफास लावला आणि स्वत:ला संपवून घेतले.हा प्रकार अर्ध्या तासाने घरच्या मंडळींच्या लक्षात आला. तोपर्यंत ते गतप्राण झाले होते. लगेच खापरखेडा पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बुधवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.कर्जापायी आत्महत्या केल्याचा अहवालया घटनेची माहिती मिळताच कामठीचे तहसीलदार बाळासाहेब टेळे, मंडळ अधिकारी लांजेवार, तलाठी बिरासदार यांच्यासह महसूल विभागातील काही अधिकाºयांनी बुधवारी सकाळी मनोहर ठाकरे यांच्या कुटुंबीयांची खापा (पाटण) येथे जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या आत्महत्येबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली. मनोहर ठाकरे यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष या अधिकाºयांनी काढला. त्यांनी याबाबत प्राथमिक अहवाल तयार करून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना पाठविला, अशी माहिती महसूल विभागातील कर्मचाºयांनी दिली.