शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 23:47 IST

हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोली पोलिसांच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोली पोलिसांच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. गौरी सुनील धुमाळ (वय १९) असे या तरुणीचे नाव असून ती धंतोलीतील शांती कुटीरमध्ये राहत होती.गौरीचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. गौरी हिने एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेतले होते. हवाईसुंदरी होण्याची तिची महत्त्वाकांक्षा होती. त्या संबंधाने आवश्यक ते सर्व प्रयत्न ती करीत होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ती शिकत होती. दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण करून अनेक दिवस झाले तरी हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे गौरीला नैराश्­य आले होते. सोमवारी गौरीचे आईवडील तिच्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यामुळे ती घरात एकटीच होती. संध्याकाळी ७ च्या सुमारास आईवडील घरी आले तेव्हा ती ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून दिसली. आई-वडिलांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारी गोळा झाले. डॉक्टरांना बोलविले तोपर्यंत ती मृत झाली होती. गौरीची आई कुमुद स्वप्निल धुमाळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांची टाळाटाळया प्रकरणात माहिती घेण्यासाठी धंतोली पोलिस ठाण्यात विविध पत्रकारांनी सकाळपासून प्रयत्न केले. मात्र पोलिस ठाण्यातील मंडळी या संबंधाने माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. आत्महत्येचे कारण काय, तरुणी काय करत होती, त्या संबंधीची माहितीही पोलिसांनी रात्रीपर्यंत दिली नाही. पोलिसांची टाळाटाळ कशासाठी होती, ते कळायला मार्ग नाही.

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर