शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शुगर सोबतच वजनही कमी करणारी औषधे : सुनील गुप्ता यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 23:09 IST

पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमधुमेहाच्या रुग्णांसाठी नवे उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मधुमेहाच्या रुग्णांसाठी नवे संशोधन व उपचार प्रणाली वरदान ठरणारी आहे. विशेष म्हणजे, ‘ग्लिफ्लोझीन’या औषधांच्या ग्रुपमुळे शरीरात वाढलेली साखर लघवीतून बाहेर टाकणे आता शक्य झाले आहे. तसेच पूर्वी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिली जाणारी इन्सुलिन विशिष्ट वेळेत घेणे आवश्यक असायचे, परंतु आता यातही नवी लस उपलब्ध झाली आहे. ‘डेग्युडे’ नावाची इन्सुलिन रुग्णाला कधीही घेता येणारी आहे, अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह रोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.‘सुनील डायबिटीज केअर अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’ व ‘डायबिटीज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिल्व्हर ज्युबली’ वर्षाच्या निमित्ताने १८ ऑगस्ट रोजी सायंटिफिक सभागृहात सकाळी ८.३० वाजतापासून ‘हॅलो डायबिटीज’ शैक्षणिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अजय अंबाडे, डॉ. मोहित झामड, डॉ. कविता गुप्ता व डॉ. सरिता उगेमुगे उपस्थित होत्या.डॉ. गुप्ता म्हणाले, भारतात मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. तरुणांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळे येत्या दहा वर्षात पुढे येणारे चित्र धक्कादायक असू शकेल. यातून मार्ग काढण्यासाठी या आजाराची जनजागृती आवश्यक आहे. गेल्या २५ वर्षांतून ‘हॅलो टायबिटीज’मधून डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी व रुग्णांना या विषयी माहिती देऊन आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.औषधे गाठणार शंभरीडॉ. गुप्ता म्हणाले, मधुमेहावरील औषधांना येत्या २०२१ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहे. या रोगावरील औषधांमध्ये नित्य बदल होत गेले आहे. परंतु नुकतेच आलेल्या ‘इम्पा ग्लिफ्लोझीन’, ‘डापा ग्लिफ्लोझीन’, ‘कामा ग्लिफ्लोझीन’ औषधे रुग्णांसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. सध्या उपलब्ध गोळ्या शरीरातील इन्सुलिनवर नियंत्रण मिळवितात. परंतु या औषधांमुळे शरीरात वाढलेली साखर थेट लघवीवाटे बाहेर पडते. यामुळे मूत्रपिंड, हृदय, ‘हार्ट फेल्युअर’चा धोका कमी होतो.हृदय, मूत्रपिंडाला मिळते संरक्षण‘गल्प-१ अ‍ॅनालॉम’ या लसीमुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, सोबतच वजन कमी होण्यास मदतही करते. या लसीमुळे हृदय, मूत्रपिंडाला संरक्षण मिळते. ‘हार्ट फेल्युअर’ धोका कमी होतो व रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यासही मदत करते, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.

टॅग्स :diabetesमधुमेहdoctorडॉक्टर