शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टर-गायकांसोबत रंगले ‘शुगर संगीत’ !!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:49 IST

लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मधुमेहाचे लक्षण आणि योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देलोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत सखी मंच आणि एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘शुगर संगीत’ हा अभिनव कार्यक्रम शनिवारी सादर झाला. हिंदी मोरभवनात आयोजित या कार्यक्रमात गायकांचे सुरेल गीत आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन श्रोत्यांनी अनुभवले. या कार्यक्रमात डॉक्टर्सनी मधुमेहाचे लक्षण आणि योग्य उपचाराबाबत मार्गदर्शन केले.एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) डॉ. जतिंदर अरोरा व डायरेक्टर (आॅपरेशन्स) सूरज त्रिपाठी यांनी दीप प्रज्वलन केले. डॉ. नितीन वडसकर, डॉ. नितीन डंभारे, डॉ. ऋषी लोहिया, डॉ. निशांत देशपांडे, डॉ. अभिषेक वांकर, डॉ. अभिजित देशमुख आणि डॉ. प्रकाश जैन यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले तर सागर मधुमटके, सारंग जोशी, विजय चिवंडे, श्रुती चौधरी व सोनाली यांनी आपल्या गोड गळ्याने श्रोत्यांची मने जिंकली. संचालन नेहा जोशी यांनी केले. पहिल्या सत्रात डॉ. नितीन वडसकर म्हणाले, अनियमित दिनचर्या, बदलती जीवनशैली व तणावामुळे देशात डायबिटीजचे रुग्ण वाढत आहेत. अशक्तपणा, भूक लागणे, हातापायात मुंग्या येणे, डोळ्यांनी कमी दिसणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अनुवांशिकता आणि जास्त वजनामुळेही हा आजार होऊ शकतो. डॉ. ऋषी लोहिया म्हणाले, शुगरच्या रुग्णांना हृदयरोगाची शक्यता असते. त्यांना ब्लॉकेजची समस्या उद्भवू शकते. छातीत दुखण्याचे कारणही शुगर असू शकते. त्यामुळे रक्तदाबाची तपासणी आणि वर्षातून किमान एकदा ईसीजी करणे आवश्यक आहे. दुसºया सत्रात डॉ. नितीन डंभारे यांनी सांगितले की, या आजारामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा बंद होऊन जाते. त्यामुळे वेळोवेळी इन्सुलिन देणे गरजेचे आहे. औषध बंद करून घरगुती उपचार करणे घातक ठरू शकते. डॉ. अभिषेक वांकर म्हणाले, शुगरमुळे रक्ताभिसरण बाधित होते. धमण्यांवरील दबावामुळे शरीरात आग, मुंग्या येण्याची शक्यता असते. तिसºया सत्रात डॉ. अभिजित देशमुख यांनी डायबिटीजमुळे पोटाचे विकार वाढत असल्याचे सांगितले. हे विकार अनियंत्रित झाल्यास फुफ्फुस आणि पैन्क्रियाजलाही नुकसानकारक ठरू शकतात. डॉ. निशांत देशपांडे म्हणाले, डायबिटीज किडनीच्या फिल्टरला खराब करू शकते. त्यामुळे प्रोटीन, मिठाची मात्रा संतुलित असली पाहिजे. डॉ. प्रकाश जैन म्हणाले, गँगरिन किंवा इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. सध्या असे तंत्र उपलब्ध आहे की ज्याद्वारे अवयव कापण्याची गरज पडत नाही.

टॅग्स :doctorडॉक्टरcultureसांस्कृतिक