शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तासभर दमदार

By admin | Updated: June 27, 2017 01:54 IST

गेल्या आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारी व सायंकाळी जोराचा पाऊ स झाला.

३८.८ मि.मी. पाऊ स : उपराजधानीत सर्वत्र पाणी-पाणी, वाहतूकही विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठ-दहा दिवसापासून दडी मारलेला मान्सून अखेर सक्रिय झाला आहे. सोमवारी दुपारी व सायंकाळी जोराचा पाऊ स झाला. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचले होते. उड्डाणपूल,चौक व वस्त्यांत पावसाच्या तडाख्यात सापडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागले. पावसाळी नाल्या साफ नसल्याने पाऊ स थांबल्यानंतर बराच वेळ पाणी साचून असल्याचे चित्र होते. नागपुरात सायंकाळी ५.३० पर्यंत ३८.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीन ते चार दिवसात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात चांगला पाऊ स होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे व सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मध्य भारतात मान्सूनला सुरुवात झाली आहे. नागपूर शहरात सकाळी ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ नंतर आकाशात ढग जमायला लागले. दीड वाजताच्या सुमारास गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काही भागात जोराचा पाऊ स झाला. जवळपास सव्वातास चांगला पाऊ स झाला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.उड्डाणपुलावरपाणी साचलेउड्डाणपुलावर सहसा पाणी साचत नाही. परंतु टेकडी मंदिर उड्डाणपुलावर सोमवारी पाणी साचले होते. किंग्सवे, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स व एलआयसी चौकातही पाणी साचले होते. रेल्वेस्टेशनवर जायचे कसे?पावसामुळे रेल्वेस्टेशन परिसरात सर्वत्र पाणी साचले होते. यामुळे स्टेशनमधून बाहेर पडणारे व स्टेशनवर जाणारे प्रवासी त्रस्त झाले होते. स्टेशनवर जायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. रामझुला व टेकडी मंदिराच्या समोरील खोलगट भागात पाणी साचले होते. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पाऊ स आला की पाणी साचतेपाऊ स आला की शहरातील काही ठिकाणी पाणी साचते. यात नरेंद्रनगर पूल, लोहापूल, शंकरनगर चौक, जगनाडे चौक, रेशीमबाग मैदानाजवळचा भाग, मेडिकल चौक, वर्धा रोडचा काही भाग, पारडी चौक ते कळमन्याकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणांचा यात समावेश आहे. कळमना बाजारातीलमिरचीचे नुकसानपावसामुळे कळमना बाजारात उघड्यावर ठेवण्यात आलेले धान्य व मिरचीची पोती भिजल्याची माहिती आहे. शेतमाल ठेवण्यासाठी शेड उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. मनपाची पोलखोल४शहरात मुसळधार पाऊ स झाला नाही. तास-दीड तास पाऊ स पडला, पण थोड्याशा पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी साचते. अर्धवट सिमेंट रस्त्यांची कामे, ठिकठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, बुजलेल्या पावसाळी नाल्या, सुरू असलेले मेट्रो रेल्वेचे काम, यामुळे थोडासा पाऊ स झाला तरी पाणी साचते. यामुळे महापालिकेने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोल खुलली आहे. नाल्यातील गाळ व कचरा साफ न केल्याने पाणी तुंबत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.