शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर कोहळेंना तिळगुळ

By admin | Updated: January 17, 2016 02:49 IST

दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांना मकरसंक्रांतीचा तिळगुळ मिळाला आहे.

भाजपाच्या शहर अध्यक्षपदी निवड : महाल कार्यालयात पदग्रहण नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांना मकरसंक्रांतीचा तिळगुळ मिळाला आहे. शनिवारी पक्षाच्या बैठकीत एकमताने त्यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होऊन कोहळेंकडे शहराची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सायंकाळी महाल येथील टिळक पुतळा कार्यालयात एका छोटेखानी सोहळ्यात मावळते अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी आ. कोहळे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला. या वेळी खा. अजय संचेती, विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकरराव देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, महामंत्री प्रभाकर येवले, प्रमोद पेंडके, संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, श्रीकांत देशपांडे, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते. निवडणूक सहप्रमुख राजेश बागडी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. आ. कृष्णा खोपडे यांनी अध्यक्षपदासाठी सुधाकर कोहळे यांचे नाव सुचविले. उपस्थित पदाधिकाऱ्यांसह मंडळ अध्यक्षांनी त्याला अनुमोदन दिले. निवडीनंतर कोहळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला. मनपात रिझल्ट देऊ - आ. कृष्णा खोपडे यांनी शहर अध्यक्ष म्हणून भाजपचा रथ बराच पुढे नेला आहे. त्यांचे काम आपणही पुढे नेऊ. पक्षसंघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम केले जाईल. महापालिकेच्या निवडणुका हे आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर या निवडणुकीतही रिझल्ट देऊ. नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवू.- आ. सुधाकर कोहळे, नवनियुक्त शहर अध्यक्ष, भाजपा