शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो...; सुधाकर गायधनींच्या ‘महावाक्याची’ विदेशात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:21 IST

आम्ही चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो, गिऱ्हाईक कसे ते फिरकेना ...

ठळक मुद्दे‘कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल’च्या २००व्या विशेषांकात समाविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाकवी सुधाकर गायधनी यांचे बहुचर्चित ‘महावाक्य’ याच्या ५५५ पानांच्या महाकाव्याची दखल युरोप-अमेरिकेने घेतली असून, या महाकाव्याला आता जगाने मान्यता दिल्याचेच हे द्योतक आहे.आम्ही चिंध्या पांघरून सोने विकायला बसलोगिऱ्हाईक कसे ते फिरकेना ...मग, सोने पांघरूनचिंध्या विकत बसलो,गर्दी पेलवता पेलवेना...या ओळींचा मा. यशवंतराव चव्हाण आपल्या भाषणातून उल्लेख करायचे. माजी मंत्री मा. राजेंद्रबाबू दर्डा यांनीसुद्धा या काव्यओळींचा जाहीर उल्लेख केला आहे. आता या ओळींचे मर्म जगाच्या चिंतनाचा विषय बनणार आहे. युरोपमधील रोमानिया या देशातील ‘कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल’ या वाङ्मयीन नियतकालिकाने आपल्या २०० व्या विशेषांकात गायधनीच्या ‘महावाक्य’ या काव्याकरिता १९ पाने खर्ची घातली आहेत.

‘महावाक्य हे एक अभिजात महाकाव्य आहे’ या शीर्षकाच्या दहापानी लेखासह महावाक्यातील नऊ पानांचा काव्यखंडही या अंकात प्रकाशित झाला आहे. या नियतकालिकाचे युरोप आणि उत्तर अमेरिकेसह जगभरात २० हजारांहून अधिक वाचक आहेत. या नियतकालिकाचे संपादक रोमानियाचे प्रसिद्ध कवी डॉ. पेण्डेफुंडा आणि त्यांच्या पत्नी आहेत. हे नियतकालिक रोमानियन आणि इंग्रजी भाषेचे त्रैमासिक असून, या अंकातील गायधनींच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद आणि संशोधनपर लेख प्रा. डॉ. ओम बियाणी या आंतरराष्ट्रीय साहित्यिकाचा आहे. यापूर्वीच त्यांनी ‘देवदूत’चा केलेला इंग्रजी अनुवाद ‘देवदूत-दी एंजल’ या नावाने रायटर्स वर्क्सशॉप कोलकाताने प्रकाशित केला असून, त्याची युनेस्को संस्थेच्या इंडेक्स ट्रान्सलेशनम डेटाबेस या विश्वयादीत नोंद झाली आहे. या कवितेमुळे गायधनींना युनेस्को मान्यता प्राप्त विश्वकवी परिषदेच्या मंगोलिया येथील संमेलनात डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे. 

टॅग्स :literatureसाहित्य