शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधितांची अशीही थट्टा!

By admin | Updated: December 1, 2014 00:48 IST

एचआयव्ही बाधितांना व्हायरल लोड मशिनवर चाचणी करण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यातच या चाचणीचा अहवाल मिळण्यास २० दिवसांच्यावर कालावधी लागत असल्याने एचआयव्ही बाधितांच्या

व्हायरल लोड मशीनअभावी गाठावी लागते मुंबई : अहवालासाठी लागतात २० दिवसनागपूर : एचआयव्ही बाधितांना व्हायरल लोड मशिनवर चाचणी करण्यासाठी मुंबई गाठावी लागते. यातच या चाचणीचा अहवाल मिळण्यास २० दिवसांच्यावर कालावधी लागत असल्याने एचआयव्ही बाधितांच्या उपचारास उशीर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.एचआयव्ही बाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी शासनाने मेडिकलमध्ये २००५ मध्ये ‘एआरटी’ केंद्र सुरू केले. सध्या या केंद्रावर सुमारे २४ हजार एचआयव्ही बाधितांची जबाबदारी आहे. यात रोज पाच ते सहा नव्या रुग्णांची भर पडत आहे. यातच दोन वर्षांपूर्वी ‘सेकंड लाईन’ उपचार पद्धतीही सुरू झाल्याने रुग्णांची गर्दीही वाढली आहे. मात्र आजही रक्तातील विषाणूंची संख्या (व्हायरल लोड) मोजण्यासाठी मुंबई गाठावी लागत असल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी शासनाकडून कुठलीही सवलत मिळत नाही. अनेक रुग्ण रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करतात.आधीच रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्यांना हा लांबचा प्रवास झेपत नाही. यातच या रुग्णाला दर सहा महिन्यांनी चाचणीसाठी मुंबई गाठावी लागते. या शिवाय मुंबईतल्या व्हायरल लोड मशीनवर नागपुरातील रुग्णाच्या वेटिंगने शंभरी गाठली आहे. रुग्णाला तीन दिवस थांबावे लागते. या चाचणीचा अहवाल येण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. परिणामी अनेक गरीब रुग्ण मुंबईला जाण्याचे टाळतात, तर काहींवर उपचार सुरू होण्यास उशीर होत असल्याने रुग्ण दगवण्याचा धोका बळावतो.(प्रतिनिधी)एआरटी सेंटरमध्ये सोयींचा अभावमेडिकमलमध्ये ओपीडी विभागाच्या पहिल्या माळ्यावर एआरटी सेंटर आहे. परंतु येथे एचआयव्ही बाधितांसाठी विशेष सोय नाही. येथे बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. रुग्ण दाटीवाटीने बसतात. वास्तविक एचआयव्ही बाधितांमध्ये प्रतिकार शक्ती राहत नाही. यामुळे क्षयरोग, त्वचा रोग, व्हायरल फ्लू सारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. या सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंत सुुविधांचा अभाव आहे . रु ग्णांच्या तपासणीचा सगळा भार अपुऱ्या स्टाफवर आहे. प्रायव्हेट कौन्सिलींग रूमही नसल्याने एड्स बाधितांच्या गोपनीयतेचा भंग होत आहे .