शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूच्या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया : महिलेला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 20:38 IST

मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील फुग्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘अ‍ॅन्युरिजम’ म्हटले जाते. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. यावर तातडीची शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेदरम्यान जीवहानी किंवा अपंगत्व येण्याचा धोका अधिक असतो. मात्र या आजाराचे तज्ज्ञ असलेले डॉ. प्रमोद गिरी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. एका ४५ वर्षीय महिलेला जीवनदान दिले.

ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेंदूतील रक्तवाहिन्यांवरील फुग्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘अ‍ॅन्युरिजम’ म्हटले जाते. हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. यावर तातडीची शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेदरम्यान जीवहानी किंवा अपंगत्व येण्याचा धोका अधिक असतो. मात्र या आजाराचे तज्ज्ञ असलेले डॉ. प्रमोद गिरी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. एका ४५ वर्षीय महिलेला जीवनदान दिले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील या शस्त्रक्रियेचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.अकोला येथील रहिवासी सुमन भाई या ४५वर्षीय महिलेचे २० एप्रिल रोजी अचानक डोके दु:खायला लागले आणि त्या बेशुद्धावस्थेत गेल्या. त्यांना अकोला येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मेंदूचा सीटी स्कॅन काढला. त्यात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. तेथील डॉक्टरांनी तातडीने नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. रुग्णाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणले असता न्युरो सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी रुग्णाला तपासले. मेंदूच्या मागच्या भागात म्हणजे छोट्या मेंदूला रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिनीवर फुगा होऊन (अ‍ॅन्युरिजम) तो फुटून रक्तस्त्राव झाला असावा, असे त्यांनी निदान केले. परंतु या ‘अ‍ॅन्युरिजम’च्या अचूक निदानासाठी ‘४ व्हेसल डीएसए’ नावाची तपासणी करणे आवश्यक असते. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ही चाचणी केली जाते. परंतु सध्या हे सेंटर कोरोनाबाधित रुग्णांसाठी आरक्षित असल्याने ही तपासणी करणे शक्य नव्हते. रुग्णाची प्रकृती पाहता जीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. स्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. गिरी यांनी आपल्या अनुभवाच्या भरवशावर ‘सीटी एन्जीओग्राफी’ या चाचणीच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ३० एप्रिल रोजी डॉ. गिरी यांनी ही शस्त्रक्रिया केली. अत्यंत गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असलेली ही शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. त्या महिलेला जीवनदान मिळाले. त्यांच्या या शस्त्रक्रियेत डॉ. सागर शहा, डॉ. संजोग गजभिये यांनी सहकार्य केले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या शस्त्रक्रियेला घेऊन डॉ. गिरी आणि त्यांच्या चमूचे कौतुक केले. विशेष म्हणजे, डॉ. मित्रा यांच्या मार्गदर्शनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा तातडीच्या शस्त्रक्रिया ‘लॉकडाऊन’मध्येही सुरू आहेत. याचा फायदा गरीब व गरजू रुग्णांना होत आहे.जगात ‘अ‍ॅन्युरिजम’च्या आठ ते दहा रुग्णाची नोंदमेडिकलशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘न्यूरो सर्जरी’ विभागात ‘लॉकडाऊन’च्या काळातही गंभीरातील गंभीर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. आतापर्यंत २५ वर शस्त्रक्रिया होऊ घातल्या आहेत. यातीलच ही एक शस्त्रक्रिया आहे. ‘अ‍ॅन्युरिजम’ हा दुर्मिळातील दुर्मिळ आजार आहे. जगात आतापर्यंत या आजाराच्या केवळ आठ ते दहा रुग्णांची नोंद आहे. यावरील शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असते.- डॉ. प्रमोद गिरी प्रमुख, न्यूरो सर्जरी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :Medicalवैद्यकीयdoctorडॉक्टर