शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

‘मंगलयान’चे यश, वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक

By admin | Updated: February 28, 2016 03:13 IST

स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे.

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर : ‘लोकमत’शी साधला संवादनागपूर : स्वत:चे तंत्रज्ञान विकसित करून मंगलयानाला अवकाशात पाठविणे हे भारताच्या वैज्ञानिक समृद्धीचे द्योतक आहे. येणाऱ्या दिवसात असे आणखी वैज्ञानिक आविष्कार पाहायला मिळतील. याचा फायदा सामान्य जनतेला होईल. देशातील वैज्ञानिक लोकांना चंद्रावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथे व्यक्त केले. लोकमतशी चर्चा करतांना डॉ. नारळीकर यांनी देश आणि विदेशात सुरू असलेल्या वैज्ञानिक संशोधनावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, वैज्ञानिक प्रयोग व शोध सातत्याने सुरू राहतात. पहाडाचे शिखर आणि दरी यांच्यातील संबंधावर प्रकाश टाकतांना डॉ. नारळीकर यांनी सांगितले, एक वेळ असते जेव्हा अनेक प्रकारचे शोध समोर येतात. तो क्षण पहाडाच्या शिखरासारखा असतो. त्यानंतर नवीन संशोधनाच्या कामाला लागणे म्हणजे खालून पहाडावर चढण्यासारखे असते. जेव्हा शिखरावर पोहोचू तेव्हा संशोधन पूर्ण होते. असेच शोध सातत्याने होत असतात. (प्रतिनिधी)एका ‘गॉड पार्टीकलने’ काही होणार नाहीडॉ. नारळीकर यांनी सांगितले की, गॉड पार्टीकलच्या शोधात जगभरातील वैज्ञानिक गुंतले आहेत. त्यात एकाच गॉड पार्टीकलचा शोध लागला आहे. केवळ एका पार्टीकलच्या शोधाने कुठलाही फायदा किंवा नुकसान समजून येणार नाही. आणखी पार्टीकलचा शोध करण्यात यावा. पार्टीकल फिजिक्समध्ये आणखी सक्रिय व्हावे लागेल. गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यास उशीर झालेला नाही गुरुत्वाकर्षण लहरींबाबत आईन्स्टाईन यांनी १०० वर्षांपूर्वीच घोषणा केली असली तरी त्याला ट्रेस करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. ते शोधण्यास उशीर झालेला नाही. मागील १० वर्षांपासून ‘लायगो एक्सपरिमेंट’ केले जात होते. परंतु अ‍ॅडव्हॉन्स लायगो एक्सपरिमेंट करण्यात आल्यामुळेच या लहरी ट्रेस करता येऊ शकतात. त्याच्यामुळे होणाऱ्या फायद्यांवर संशोधन सुरू आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी सांगितले.