शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अपयशाचे पुस्तक वाचल्यावरच यश

By admin | Updated: February 1, 2016 02:54 IST

लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.

स्कील डेव्हलपमेंट : आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर सचिन बुरघाटे यांची तरुणांना सादनागपूर : लहानपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. अपयश हे संपूर्ण पुस्तक आहे. ज्याच्या शेवटच्या पानावर यश लिहिलेले आहे आणि ते वाचायचे असेल तर तुम्हाला संपूर्ण पुस्तक वाचावेच लागेल, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय मोटिव्हेटर सचिन बुरघाटे यांनी रविवारी तरुणांना साद घातली. निमित्त होते. फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने मानकापूर येथील क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या युथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये आयोजित मार्गदर्शनपर सत्राची. ‘स्कील डेव्हलपमेंट भावी काळाजी गरज’ या विषयावर मार्गदर्शन करताना सचिन बुरघाटे यांनी आपल्या अनोख्या शैलीने उदाहरणे सादर करीत तरुणांची मने जिंकली. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानाची सुरुवात त्यांनी एका उदाहरणाने केली. त्यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयाची मी नवीन इमारत बांधली. तेव्हा अनेक लोक दूरवरून येत होते. त्या इमारतीची खूप प्रशंसा करायचे. परंतु सर्वात जास्त प्रशंसा ही इमारतीच्या फ्लोअर गाईडची करायचे आजही त्याचे तितकेच कौतुक केले जाते. परंतु ते काम त्याच व्यक्तीकडून करून घेण्यासाठी मी अनेक दिवस वाट पाहिली. त्याच्याकडे वेळ नव्हता. अनेक जण म्हणायचे की दुसऱ्याकडून काम करवून घ्या. परंतु मला जे काम करायचे होते, ते तीच व्यक्ती चांगले करू शकेल, याची मला पूर्ण खात्री होती. काम झाल्यावर ते सिद्ध झाले. यालाच कौशल्य म्हणजे स्कील असे म्हणतात. कुठलेही क्षेत्र असो किंवा काम असो, त्यात मास्टरकी असणे म्हणजेच स्कील आहे. जे कार्य कराल ते चांगले करा, यश नक्कीच मिळेल. एक-दोन अपयश नव्हे तर अनेक अपयशानंतर यश प्राप्त होत असते, असे स्पष्ट करीत यासंदर्भात अनेक उदाहरणे सादर करीत अपयशाला घाबरू नका, असे आवाहन त्यांनी केले. याच विषयावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करण्यासाठी अभ्यास, सराव, परिश्रम, शिस्त आणि लॉजिक यावर भर देण्यास सांगितले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रुरल इंडस्ट्राईजेशन(एमगीरी)चे संचालक प्रफुल्ल काळे यांनी एमगीरीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणपर अभ्यासक्रमाची माहिती सादर केली. (प्रतिनिधी)