शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

गोंदिया जिल्हा न्यायालयासाठी सुधारित आराखडा सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 19:59 IST

गोंदिया येथील पोलीस विभाग, जिल्हा न्यायालय प्रशासन व महसूल विभाग कर्मचारी संघटना यांच्यामध्ये भूखंडाच्या बाबतीत सामंजस्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी गोंदिया जिल्हा न्यायालयाची इमारत व इतर संबंधित बांधकामांसाठी आवश्यक जमीन मिळावी याकरिता एक आठवड्यात सुधारित ले-आऊट सादर करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : भूखंडांत सामंजस्य होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोंदिया येथील पोलीस विभाग, जिल्हा न्यायालय प्रशासन व महसूल विभाग कर्मचारी संघटना यांच्यामध्ये भूखंडाच्या बाबतीत सामंजस्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी गोंदिया जिल्हा न्यायालयाची इमारत व इतर संबंधित बांधकामांसाठी आवश्यक जमीन मिळावी याकरिता एक आठवड्यात सुधारित ले-आऊट सादर करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला.सुधारित ले-आऊट सादर करण्यापूर्वी प्रधान जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी व पोलीस उपअधीक्षक यांच्याशी सल्लामसलत करण्याची सूचना कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आली आहे. यासंदर्भात गोंदिया जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. पराग तिवारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी शासनाने २३ कोटी ८४ लाख ७४ हजार ५६१ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. निविदा प्रक्रियेसाठी २०१७-१८ वर्षाच्या अर्थसंकल्पात २ कोटी ४० लाख रुपयांची तरतुद करण्यात आली होती. तसेच, न्यायाधीशांच्या निवासस्थानांसाठी ७ कोटी ६० लाख ५३ हजार ८४६ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रियेसाठी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रवींद्र पांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय