शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीचा वस्तुस्थिती अहवाल न्यायालयास सादर करा

By admin | Updated: March 21, 2017 02:04 IST

महाराष्ट्र ठेवीदारांचे हित व संरक्षण कायदा १९९९ अंतर्गत जप्तीच्या स्थावर मालमत्तेचा वस्तुस्थिती अहवाल...

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे : स्थावर आणि जंगम मालमत्ता, १० एप्रिल २०१७ पर्यंतची मुदत नागपूर : महाराष्ट्र ठेवीदारांचे हित व संरक्षण कायदा १९९९ अंतर्गत जप्तीच्या स्थावर मालमत्तेचा वस्तुस्थिती अहवाल आणि मूल्यांकनाची कारवाई पूर्ण करून १० एप्रिलपर्यंत अहवाल न्यायालयास सादर करावा. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांना वस्तुस्थिती अवगत करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले. मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे अधिकारी संचालक प्रशांत जयदेव वासनकर यांनी गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याने त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हा न्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मालमत्तेची वस्तुस्थिती मूल्यांकित करण्याकरिता उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.बैठकीत २७ मार्च २०१७ पर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेचा अहवाल गठित केलेल्या समितीच्या प्रतिनिधींनी सादर केला. मे. वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचे अधिकारी संचालक प्रशांत जयदेव वासनकर, अभिजित चौधरी, भाग्यश्री वासनकर, मिथिला वासनकर, कर्मचारी चंद्रकांत रॉय व आदींनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याने अंबाझरी पोलीस स्टेशनअंतर्गत कलम ४०६, ४२०, ५०६, १२० बी भादंविसह कलम ३ व महा.एम.पी.आय.डी.आय. कायदा १९९९ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. तसेच ११ मार्च २०१५ रोजी एकूण २१ स्थावर मालमत्ता किंमत मुद्रांक नोंदणीप्रमाणे १७ कोटी ५८ लाख ३१ हजार ६०० आणि ६७ बँक खात्यातील जमा शिल्लक रक्कम १६ लाख ९९ हजार ०८१ रुपये तसेच ९४ लाख ३४ हजार ४९५ रक्कमेची जंगम मालमत्ता शासनाला देण्याची अधिसूचना काढलेली आहे.गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त यांच्या माहितीप्रमाणे तक्रार गुंतवणूकदारांची संख्या ६८८ आहे. गुंतवणुकीची मूळ रक्कम ९८ कोटी ७१ लाख ३६ हजार ४०३ त्यापैकी परताव्याची रक्कम १ अब्ज ८३ कोटी ४८ लाख ५८ हजार ५८५ एवढी आहे. शासनाने जप्त केलेल्या मालमत्तेबाबत जिल्हा न्यायालय, नागपूर येथे जिल्हा न्यायाधीश -७ यांच्याकडे मिस. सिव्हिल अप्लिकेशन क्र ६/२०१६ च्या अनुषंगाने मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्षम अधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावासनुसार न्यायालयाने १९ मालमत्तेवर कलम ७ अन्वये जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. (प्रतिनिधी)