शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
3
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
4
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
5
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
6
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
7
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
8
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
9
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
10
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
11
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
12
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
13
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
14
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
15
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
16
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
17
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
18
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
19
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
20
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धिक संपदेच्या रक्षणासाठी अभ्यासवर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:35 IST

संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लूआयपीओ अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था....

ठळक मुद्देविभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संयुक्त राष्ट्रांतर्गत कार्यरत जागतिक बौद्धिक संपदा संस्था (डब्लूआयपीओ अकादमी), केंद्र शासनाच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्था आणि महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सिव्हिल लाईन्सस्थित आरजीएनआयआयपीएम येथे ६ ते १७ नोव्हेंबरदरम्यान बौद्धिक संपदेविषयी ग्रीष्मकालीन अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. पेटंटस्, डिझाईन व ट्रेडमार्कचे महानियंत्रक एस.ओ.पी. गुप्ता, डब्ल्यूआयपीओ अकादमीच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे संस्थाप्रमुख जोसेफ एम. ब्रॅडली, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार आणि पेटंट व डिझाईन्सचे संयुक्त नियंत्रक डॉ. के.एस. कर्डाम  याप्रसंगी उपस्थित होते. बांगलादेश, कोरिया, भारत, दक्षिण आफ्रिका, दुबई यासह अनेक देशांतील सुमारे ४८ प्रतिनिधी या अभ्यासवर्गात सहभागी झाले आहेत. या अभ्यासवर्गाच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना बौद्धिक संपदा (आय.पी.)क्षेत्रातील सविस्तर ज्ञान घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी अनुप कुमार यांनी बौद्धिक संपत्तीचे विशेषत: भौगोलिक संकेतांक यांचे संरक्षण, बौद्धिक संपदा हक्कांची सुलभ नोंदणी-प्रक्रिया व त्यांची कार्यक्षम अंमलबजावणी यावर भर दिला.महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरचे प्रा.डॉ. नरेश कुमार वत्स यांनी आभार मानले केले. आरजीएनआयआयपीएम नागपूरचे प्रमुख व सहायक नियंत्रक पेटंटस् आणि डिझाईन्स पंकज बोरकर,आरजीएनआयआयपीएमच्या वरिष्ठ दस्तऐवज अधिकारी (सिनियर डॉक्युमेन्टेशन आॅफिसर) सी.डी. सातपुते, वरिष्ठ संयुक्त नियंत्रक पेटंटस् आणि डिझाईन्स, पेटंट आॅफिस नवी दिल्लीचे डॉ. के.एस. कदम,  सुखदीप सिंग, डॉ. मनीष यादव, डॉ. रागिणी खुबाळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.