शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

मूलभूत सोयींसाठी ‘माफसू’त विद्यार्थ्यांचे आंदोलन

By admin | Updated: September 2, 2014 01:13 IST

मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी ‘माफसू’तील (महाराष्ट्र राज्य अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरी युनिव्हर्सिटी) विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध सोमवारी आंदोलन केले. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी

नागपूर : मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात याव्यात, या मागणीसाठी ‘माफसू’तील (महाराष्ट्र राज्य अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरी युनिव्हर्सिटी) विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध सोमवारी आंदोलन केले. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी ‘माफसू’च्या परिसरात निदर्शनास सुरुवात केली. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने अखेर मागण्यांची पूर्तता करण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.विद्यापीठाच्या वतीने पशु, डेअरी आणि मत्स्यविज्ञान महाविद्यालय चालविण्यात येते. या तीन महाविद्यालयांमधील पशु व डेअरी महाविद्यालयांना वसतिगृहासह सगळ्या सोयींची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र, तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे येथील प्रशासनाने पार दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शासनातर्फे वेळोवेळी महाविद्यालयाला अनुदान मिळूनही वसतिगृह, कॉमन रूम, मुलींसाठी प्रसाधनगृह आदी मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधा येथे नाहीत. यासंदर्भात वारंवार मागण्या केल्या; परंतु प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. शनिवारीदेखील ‘माफसू’च्या कुलगुरूंसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. यावेळी प्रशासनाने काही मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन दिले होते.परंतु प्रशासनाने तत्काळ आश्वासनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलनास सुरुवात केली. कुलगुरू कार्यालयापासून अवघ्या काही अंतरावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची सायंकाळपर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही. शेवटी विद्यापीठातर्फे विद्यार्थी कल्याण संचालकांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले. परंतु प्रशासनाने लेखी आश्वासन द्यावे, असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)