शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

मोर्चेकऱ्यांमुळे विद्यार्थी, रुग्णांची कुचंबणा

By admin | Updated: December 10, 2015 03:02 IST

बेशिस्त मोर्चेकऱ्यांमुळे आणि वाहतूक पोलीस योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे तीन दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडले : अनेक ठिकाणी जामनागपूर : बेशिस्त मोर्चेकऱ्यांमुळे आणि वाहतूक पोलीस योग्य नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे तीन दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बेशिस्त मोर्चेकऱ्यांमुळे सर्वात जास्त कुचंबणा विद्यार्थी आणि रुग्णांची होत आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे विधिमंडळावर पहिल्याच दिवशीपासून मोर्चे धडकत आहेत. पहिल्या दिवशी आदिवासींचा भव्य मोर्चा विधिमंडळावर धडकला. पहिल्याच मोर्चाने धंतोली, सीताबर्डी, मुंजे चौक, महाराजबाग, विद्यापीठ परिसर आणि सदरमध्ये वाहतुकीचा खोळंबा झाला. सीताबर्डीत तर पोलीस ठाण्यासमोरच गोंधळ उडाला. जागोजागी वाहनांची गर्दी झाली. त्यामुळे नागपूरच नव्हे तर बाहेरून आलेल्यांचीही कुचंबणा झाली.अपेक्षेपेक्षा जास्त नागरिक आणि वाहने आल्यामुळे तसेच पहिला दिवस असल्यामुळे अंदाज चुकला असावा, असे मानून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही अशीच स्थिती होती. काँग्र्रेसच्या दणकेबाज मोर्चामुळे उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेची पुरती दाणादाण उडाली. रहाटे कॉलनी, दीक्षाभूमी परिसर, लक्ष्मीभवन चौक, सदर, सिव्हिल लाईन, धंतोली, मुंजे चौक, रेल्वेस्थानक मार्ग, कस्तूरचंद पार्क, विद्यापीठ परिसर, आकाशवाणी चौक, महाराजबाग, धरमपेठसह अनेक भागात ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा उडाला. फर्लांगभर अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा-पाऊण तासाचा वेळ लागत होता. वाहनांचा खोळंबा झाला, त्यात अनेक ठिकाणी रुग्णवाहिका, स्कूल व्हॅन होत्या. धूर, कर्णकर्कश भोंगे यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, छोटे छोटे विद्यार्थी यांची मोठी कुचंबणा झाली. (प्रतिनिधी)