शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

३५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेले ते विद्यार्थीही अकरावी प्रवेशास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:12 IST

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला ...

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्के गुणांचा निकष निर्धारित केला आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण नाहीत म्हणून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी दिला.

यासंदर्भात जतीन घाेटेकर या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. जतीनने इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई अंतर्गत पूर्ण केले आहे. त्याला इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात ३३ टक्के गुण आहेत. सीबीएसईच्या निकषानुसार तो या विषयात उत्तीर्ण झाला आहे. दहावीनंतर त्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गतच्या इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. संबंधित महाविद्यालयाने त्याला प्रवेशही दिला. पुढे त्याने इयत्ता अकरावीची परीक्षा उत्तीर्ण करून इयत्ता बारावीची परीक्षा दिली. दरम्यान, राज्य मंडळाला जतीनने इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात ३५ टक्के गुण मिळविले नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्याचा अकरावीतील प्रवेश अवैध ठरवण्यात आला. पात्र नसताना जतीनला अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आला असे कारण मंडळाने दिले. त्यामुळे जतीनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने कायदेशीर बाबी लक्षात घेता जतीनला इयत्ता अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी पात्र ठरवले, तसेच राज्य मंडळाचा विवादित निर्णय रद्द केला. याशिवाय, जतीनचा इयत्ता बारावीचा निकाल सात दिवसात जाहीर करा, असा आदेश मंडळाला दिला. जतीनच्यावतीने ॲड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.