शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या

By admin | Updated: September 10, 2015 03:43 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’साठी (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे.

नागपूर विद्यापीठ : दोन दिवसांत सुमारे १५०० अर्ज दाखलनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘पेट’साठी (पीएचडी एन्ट्रन्स टेस्ट) अर्ज दाखल करणे सुरू झाले आहे. यंदा ‘पेट’ला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून सुरुवातीच्या दोन दिवसातच सुमारे १५०० अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षीपासून ‘पेट’ परीक्षा ही विषयनिहाय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी यंदा ‘पेट’साठी अर्ज भरण्यास प्राधान्य दिले आहे.नागपूर विद्यापीठात दरवर्षी ‘पेट’ या ‘आॅनलाईन’ परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यंदापासून प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठीसोबतच हिंदी भाषेतदेखील राहणार आहे.त्यामुळे हिंदी भाषिक विद्यार्थ्यांसमोरील मोठी अडचण दूर झाली आहे. शिवाय यंदापासून ‘पेट’च्या शुल्कासाठी बँकेचे चालान भरणे, डीडी काढणे अशी लांबलचक प्रक्रियेपासून विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे. केवळ एका ‘क्लिक’वर विद्यार्थ्यांना शुल्क भरता येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘पेट’चे स्वरूप पुढील वर्षीपासून बदलण्यात येणार आहे. नव्या स्वरूपात दोन पेपर राहणार असून, यात विषयाशी संबंधित प्रश्नपत्रिकेचा समावेश राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होणे हे विद्यार्थ्यांसाठी सोपे राहणार नसल्याचे स्पष्ट आहे.या सर्व बाबी लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांचा यंदा ‘पेट’ देण्याकडे ओढा असून पहिल्या दिवशीपासूनच ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दोन दिवसांतच सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे यंदा अर्जांचा ‘रेकॉर्ड’ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ‘पेट’ची ‘आॅनलाईन’ परीक्षा ९ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत होणार असून निकाल १६ आॅक्टोबर रोजी संकेतस्थळावर मिळणार आहे. (प्रतिनिधी)