शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘फाईन आटर््स’मधील विद्यार्थी ‘कला’कार नाही

By admin | Updated: July 3, 2017 02:30 IST

साधारणत: रंगमंच किंवा ‘ड्रामा’ची आवड असणारा विद्यार्थी हा कलाकार होण्याची स्वप्ने पाहत असतो.

राज्य शासनाचा अजब निर्देश : आंतरशास्त्रीय विद्याशाखेत समावेशयोगेश पांडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: रंगमंच किंवा ‘ड्रामा’ची आवड असणारा विद्यार्थी हा कलाकार होण्याची स्वप्ने पाहत असतो. त्यातूनच तो ‘फाईन आटर््स’मध्ये प्रवेश घेऊन कलेचे धडे गिरवतो. कलाकारांना घडविणारा अभ्यासक्रम अशी याची ओळख आहे. परंतु राज्य शासनाला मात्र हा अभ्यासक्रम कला शाखेतील नसल्याचा अजब जावईशोध लागला आहे. म्हणूनच की काय या अभ्यासक्रमाचा समावेश आता आंतरशास्त्रीय विद्याशाखेमध्ये करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्देशामुळे विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.१९९४ च्या विद्यापीठ कायद्यानुसार सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये नऊ विद्याशाखा होत्या. यात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, विज्ञान, वाड्मय, सामाजिकशास्त्र, गृहविज्ञान, औषध, वाणिज्य, विज्ञान, विधी यांचा प्रामुख्याने समावेश होता. मात्र नव्या कायद्यात विद्याशाखांची संख्या चार इतकीच मर्यादित करण्यात आली आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यशास्त्रे आणि आंतरशास्त्रीय विद्याशाखा यांचा समावेश आहे. याअगोदर ‘फाईन आर्टस’ हा अभ्यासक्रम कला शाखेत समाविष्ट होता. नागपूर विद्यापीठात हा विभाग १९८० पासून असून येथून अनेक रंगकर्मी व कलाकारांनी शिक्षण घेतले आहे. या विभागात नृत्य, ड्रामा, संगीत, चित्रकला, अप्लाईड आटर््स इत्यादी ‘स्पेशलायझेशन’ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे सर्व विषय कलेशीच निगडित आहेत. नव्या नियमांनुसार कला शाखेशी संबंधित सर्व विषय मानव्यशास्त्र विद्याशाखेत समाविष्ट झाले आहे. त्यामुळे ‘फाईन आटर््स’ विभागाचा समावेशदेखील मानव्यशास्त्रमध्येच होणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने स्थापना केलेल्या डॉ. आर. एस. माळी यांच्या समितीने ‘फाईन आटर््स’चा समावेश आंतरशास्त्रीयविद्याशाखेत केला आहे. यामुळे शिक्षणतज्ज्ञ तसेच शैक्षणिक-सांस्कृतिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनी आम्ही राज्य शासनाच्या निर्देशांचेच पालन करत असल्याचे स्पष्ट केले.