शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2015 02:52 IST

शाळेत जाण्यासाठी पालक विश्वासाने आपल्या चिमुकल्यांना व्हॅनचालकाच्या हवाली करतात. मात्र त्यांचा काळजाचा तुकडा चक्क स्कूल व्हॅनमधून नव्हे तर एका धोकादायक व्हॅनमधून प्रवास करतो आहे,

अनेक स्कूल व्हॅन बेलगाम : नियमांचे सर्रास उल्लंघनसुमेध वाघमारे  नागपूरशाळेत जाण्यासाठी पालक विश्वासाने आपल्या चिमुकल्यांना व्हॅनचालकाच्या हवाली करतात. मात्र त्यांचा काळजाचा तुकडा चक्क स्कूल व्हॅनमधून नव्हे तर एका धोकादायक व्हॅनमधून प्रवास करतो आहे, याची फार कमी जणांना जाणीव असते. स्कूल व्हॅनमधून रोज हजारो चिमुकल्यांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे. ज्या वाहनात आपण बसलो त्याचा कधीही घात होऊ शकतो, या निष्पाप जीवांना माहितही नसते. मात्र याची पुरेपूर कल्पना असलेले पालक, चौकातील वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांना असतानाही ते दुर्लक्ष करीत असल्याने हा जीवघेणा प्रवास राजरोसपणे सुरू असल्याचे दाहक वास्तव आहे,विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. उपराजधानीतील ३० टक्के विद्यार्थी हे स्कूल व्हॅनमधून प्रवास करतात. परंतु शहरात धावणाऱ्या ६० टक्के स्कूल व्हॅनचालक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र आहे. स्कूल व्हॅनची आसन क्षमता मूळ आसन क्षमतेच्या दीडपट म्हणजे ‘१०’ अधिक ‘१’ अशी असताना शेळ्यामेंढ्या कोंबाव्यात तशाप्रकारे एकावेळी १२ ते २० मुले बसवली जातात. यासाठी मूळ आसनामध्ये बदल करतात. व्हॅनमधील आसनाच्या कुठल्याही बाजूला आधारासाठी हॅन्डल असावे, असा नियम असताना अनेक व्हॅनमध्ये ते राहत नाही, दप्तरे ठेवण्यासाठी जागा नसल्याने विद्यार्थी मांडीवर दप्तर घेऊन बसतात.स्कूल व्हॅनसाठी हे आहेत नियममवैध गॅस किट असावी.व्हॅन १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी नसावी.मूळ आसन क्षमतेच्या दीडपट म्हणजे १० अधिक १ असावी.व्हॅनमधील आसनाच्या कुठल्याही बाजूला आधारासाठी हँडलची तरतूद असावी. चालकाचे आसनाचे क्षेत्र स्वतंत्र असावे.सुसज्ज प्रथमोपचार पेटी असावी.आयएसआय मार्क असलेली एबीसी प्रकाराची अग्निशमन उपकरणे असावी.आसनाखाली दप्तरे ठेवण्यासाठी जागा असावी.महापालिकेच्या हद्दीमध्ये व्हॅनची वेगमर्यादा ४० किलो मिटर प्रति तासापेक्षा जास्त असायला नको यासाठी ‘स्पिड गव्हर्नर’ लावणे आवश्यक आहे. व्हॅनला पिवळा रंग आणि शाळेत जाणाऱ्या मुला-मुलीचे चित्र व स्कूल बस हे लिहिलेले असावे आदी नियम आहेत.