शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना हॉल तिकीटसाठी मागितले जाताहेत स्टॅम्पपेपर व चेक

By आनंद डेकाटे | Updated: May 26, 2023 16:47 IST

Nagpur News केंद्र सरकारद्वारे जमा होणारी शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात जमा करणेसंदर्भात व्यावसायिक अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये विद्यार्थ्यांना बळजबरीने ५०० रूपयाचा स्टॅम्पपेपर व चेक जमा करण्याचा निमयबाह्य पद्धतीने तगादा लावत आहेत.

आनंद डेकाटे नागपूर : केंद्र सरकारद्वारे जमा होणारी शिष्यवृत्तीची ६० टक्के रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात जमा करणेसंदर्भात व्यावसायिक अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये विद्यार्थ्यांना बळजबरीने ५०० रूपयाचा स्टॅम्पपेपर व चेक जमा करण्याचा निमयबाह्य पद्धतीने तगादा लावत आहेत. जे विद्यार्थी स्टॅम्पपेपर व चेक जमा करणार नाही तर त्यांच्या परिक्षेचे हॉल तिकीट रोखण्यात येईल असा धमकीवजा आदेशही शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना महाविद्यालयाद्वारे देण्यात येत असल्याची बाब मानव अधिकार संरक्षण मंचने उघडकीस आणली आहे.

केंद्र सरकार ६० शिष्यवृत्तीच्या सूचना यापूर्वीच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाला होता त्या विद्यार्थ्यांनी ती रक्कम महाविद्यालया परत सुद्धा केली. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता असते म्हणून विद्यार्थी महाविद्यालयाने दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळत असतात. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्यांने महाविद्यालयाला निधी परत केला नसेल तरी महाविद्यालय त्या विद्यार्थ्याला सूचना देऊन तसेच त्याची महत्त्वाची कागदपत्रे अडवून निधी प्राप्त करू शकतो असे असतांना सुद्धा महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांना बंधने लादून विद्यार्थ्यांना भाग पाडणे हा गुन्हा ठरते.विद्यार्थ्यांनी स्टॅम्पपेपर व चेक जमा करण्यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू तसेच समाजकल्याण विभागातर्फे कुठलेच आदेश किंवा सूचना नसतांना महाविद्यालयाद्वारे विद्यार्थ्यांवर जाचक अटी लादून अन्याय केला जात असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची बळजबरी करणाऱ्या महाविद्यालयांवर तातडीने कारवाई करावी. तसेच विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही, यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना द्यावी. यासंदर्भात विद्यापीठ व समाजकल्याण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.आशिष फुलझेले, सचिव, मानव अधिकार संरक्षण मंच

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र