शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
4
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
5
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
6
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
7
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
8
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
9
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
10
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
11
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
12
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
13
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
14
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
15
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
16
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
17
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
18
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
19
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
20
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!

विद्यार्थीच नव्हे संस्थाही कागदोपत्रीच?

By admin | Updated: January 9, 2017 02:42 IST

अनुदान तसेच शिष्यवृत्तीच्या नावाखाली शासनाकडून कोट्यवधींची रोकड उचलणाऱ्या महाभागांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशच

सारेच धक्कादायक : चौकशीत चक्रावणारी माहिती नरेश डोंगरे ल्ल नागपूर अनुदान तसेच शिष्यवृत्तीच्या नावाखाली शासनाकडून कोट्यवधींची रोकड उचलणाऱ्या महाभागांनी विद्यार्थ्यांचे प्रवेशच नव्हे तर शिक्षण संस्थांही कागदावरच तयार केल्याचा संशय वाढवणारी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. लाखोंचे अनुदान अन् शिष्यवृत्ती महाघोटाळ्याचे नागपुरात गुन्हे दाखल झाल्यानंतर प्राथमिक चौकशीत उघड झालेल्या या माहितीने चौकशी करणारेही चक्रावले आहे. विशेष म्हणजे, या खळबळजनक प्रकरणातील दोषी संस्थाचालकांना शासनाचे लाखोंचे अनुदान मिळवून देताना संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाक तोंडच नव्हे तर डोळेसुद्धा बंद करून जबाबदारी पार पाडल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे कागदोपत्री संस्थानिक बनलेल्या आरोपींसोबत संबंधित विभागातील काही भ्रष्टाचाऱ्यांची भागीदारी आहे काय, अशी शंका निर्माण झाली आहे. तेलंगखेडी, रामनगरातील रहिवाशी विशाल अरुण माटे या विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून कुसुमताई वानखेडे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रशिक्षण केंद्राचा शिक्षक उमेश लाकडे तसेच स्वामी विवेकानंद संस्थेच्या मुख्याध्यापकासह संस्थेच्या संचालक आणि अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध बजाजनगर पोलीस ठाण्यात ३ जानेवारीला फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे रोशन दिलीप करवाळे (वय २१, रा. आंबेडकर कॉलनी) याची तक्रार आली. त्यावरून जरीपटका पोलिसांनी नॅशनल स्टडी आॅफ प्रोफेशनल इन्स्टिट्यूट(भीम चौक)च्या प्राचार्य आणि संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घोटाळा जुना, प्रकरण नवीन ! दोन वर्षांपूर्वी राज्यातील विविध भागात अनेक संस्थाचालकांनी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट प्रवेश दाखवत शासनाला कोट्यवधींचा चुना लावला. अनुदान आणि शिष्यवृत्ती घोटाळयाचे धागेदोरे गडचिरोलीपासून बीड, सांगली, साताऱ्यापर्यंत विस्तारले असल्याचे उघड झाले. त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनात एक विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमली. या समितीने राज्यातील कोणत्या संस्थांनी बनवाबनवी करून किती कोटी रुपये उकळले त्याचा अहवाल सरकारला दिला होता. हे प्रकरण शांत होण्याच्या स्थितीत असतानाच आता नवीन प्रकरणं उजेडात येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, या घोटाळ्याच्या चौकशी समितीचे प्रमुख डॉ. व्यंकटेशम सध्या नागपुरात पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या अधिकार क्षेत्रातच आता या घोटाळ्याची नवी प्रकरणं उघड होऊ लागल्याने आयुक्तांनी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे (ईओडब्ल्यू) पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांच्याकडे सोपविला आहे.