शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजसमोर विद्यार्थ्याची हत्या

By admin | Updated: January 21, 2016 02:31 IST

मुलीसोबत बोलण्याच्या कारणामुळे उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खून करण्यात आला. ....

कामठीतील घटना : एका आरोपीला अटक, चौघे पसारकामठी : मुलीसोबत बोलण्याच्या कारणामुळे उद्भवलेल्या भांडणात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच खून करण्यात आला. या घटनेत दोन विद्यार्थी जखमी झाले. खुनाची ही घटना कामठीतील सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कामठीत काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर चार साथीदार पसार झाले आहेत. शेख दानिश शेख अन्वर (२०, रा. नया गोदाम, कामठी) असे मृताचे तर जखमीमध्ये त्याचा लहान भाऊ शेख राजिक शेख अन्वर (१६) आणि त्याचा मित्र आकाश श्यामलाल राऊत (२१) यांचा समावेश आहे. आरोपीमध्ये अमन अनिल यादव (१८) याच्यासह इतर चौघांचा समावेश आहे. यापैकी अमनला अटक करण्यात आली. दानिश हा सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होता. तो त्याचा भाऊ राजिक (११ वी)आणि मित्र आकाश यांच्यासह बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महाविद्यालयात आला. ११.३० वाजताच्या सुमारास तो महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थिनीसोबत बोलत होता. त्याचवेळी बारावीत शिकणारा अमन यादव तेथे आला. त्याने मुलीसोबत का बोलतो, अशी दानिशला विचारणा केली. त्यामुळे वाद उद्भवून दानिश आणि त्याचा भाऊ राजिक या दोघांनी अमनला मारहाण केली. छातीवर केले चाकूने वारनागपूर : मारहाणीबाबत त्याने त्याच्या चार साथीदारांना माहिती दिली. त्या सर्वांसोबत अमन दुपारी १ वाजताच्या सुमारास महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर उभा होता. तेथे राजिक आला असता आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या मदतीसाठी सादिक धावला असता आरोपीने दानिशच्या छातीवर चाकूने वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ होऊन दानिश तेथेच पडला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी आकाश आला. मात्र आरोपींनी त्याच्या मांडीवर चाकूने वार केला. यानंतर सर्व आरोपी कन्हानच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती कामठी पोलिसांना मिळताच ठाणेदार उत्तम मुळक, सहायक पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चचेरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दानिशला मृत घोषित केले. राजिकच्या डोक्याला किरकोळ दुखापत असून आकाश हा गंभीर आहे. त्याच्यावर सध्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)