शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By admin | Updated: May 17, 2017 02:19 IST

पोहणे येत नसतानाही पोहण्याचा मोह अनावर झाल्याने मित्रासोबत जलाशयात उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.

पोहण्याचा मोह अंगलट : खिंडसी जलाशयातील घटना लोकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पोहणे येत नसतानाही पोहण्याचा मोह अनावर झाल्याने मित्रासोबत जलाशयात उतरलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रामटेक तालुक्यातील खिंडसी जलाशयातील नळ योजनेच्या ‘जॅकवेल’जवळ मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. स्थानिक मासेमाऱ्यांनी दोन तास शोधमोहीत राबवून फराजचा मृतदेह बाहेर काढला. फराज मोहम्मद कुरेशी (१८, रा. शीतलवाडी, रामटेक) असे मृत तरुणाचे नाव आहे. फराज हा रामटेक येथील समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा (विज्ञान शाखा) विद्यार्थी होता. हल्ली खिंडसी जलाशयात पोहणाऱ्यांची गर्दी आहे. फराजही गेल्या तीन दिवसांपासून रोज सकाळी मित्रांसोबत खिंडसी जलाशयात पोहण्यासाठी जायचा. पोहणे येत नसल्याने तो शिकण्याचा प्रयत्न करीत होता. फराज मंगळवारी सकाळी त्याचा वर्गमित्र आदित्य दिलीप भुतखेडे (१८, रा. रामटेक) याच्यासोबत खिंडसी जलाशयात पोहायला गेला होता. दोघेही जलाशयातील नळ योजनेच्या ‘जॅकवेल’जवळ पाण्यात उतरले. फराज अंदाजे पाच फूट आत जाताच त्याला खोलीचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार लक्षात येताच आदित्यने लगेच आरडाओरड केली. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. फराज आदित्यच्या डोळ्यादेखत बुडाला. आदित्यने लगेच मोबाईलवरून या घटनेची माहिती फराजच्या कुटुंबीयांना दिली. माहिती मिळताच कुटुंबीयांसह पोलीस व मासेमारी घटनास्थळी दाखल झाले. मासेमाऱ्यांनी दोन तासात फराजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दुपारी ३ नंतर त्याच्या पार्थिवावर स्थानिक कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोहण्यास प्रतिबंध घालावा खिंडसी जलाशयात पोहणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. यात लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा समावेश आहे. या जलाशयात बुडून आजवर अनेकांचा मृत्यू झाला. वारंवार घडणाऱ्या या घटना विचारात घेता, सिंचन विभागाने या जलाशयात पोहण्यावर बंदी घालावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. फराजचे वडील मोहम्मद कुरेशी भारतीय स्टेट बँकेच्या रामटेक शाखेत नोकरी करतात. फराजला मोठा भाऊ असून, तो रामटेकच्या किट्सचा विद्यार्थी आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती.