शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर अडकले २८ भाविक : गर्दीमुळे चढू शकले नाही गाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:31 IST

रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाने केली जाण्याची व्यवस्था

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रामेश्वरम येथून आलेले ८० प्रवासी नागपूर रेल्वेस्थानकावर उतरले. येथून त्यांना अलाहाबादला जायचे होते. परंतु एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये यातील ५२ प्रवासीच चढू शकले. उर्वरित २८ प्रवासी रेल्वेस्थानकावर अडकले. त्यांना जाण्यासाठी कुठलीही रेल्वेगाडी नव्हती. अखेर रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दलाने पुढाकार घेऊन खासगी वाहनाची व्यवस्था केली आणि या भाविकांना त्यांच्या गावाकडे रवाना केले.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील निवासी चंद्रदत्त त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूणू ८० प्रवासी दहा दिवसांपूर्वी तीर्थयात्रेला निघाले होते. जगन्नाथपुरी, श्रीशैलम, तिरुपती आदी तीर्थक्षेत्रांच्या दर्शनानंतर दोन दिवसांनी ते रामेश्वरमला पोहोचले. येथून त्यांना अलाहबादला जायचे होते. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेगाड्या रद्द झाल्या. त्यांच्याजवळ आरक्षणाची रेल्वे तिकिटे होती. मात्र, गाडी मिळत नसल्याने त्यांनी स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मिळेल त्या गाडीने ते अलाहबादकरिता निघाले. दरम्यान, ही गाडी अलाहबादला नव्हे तर दिल्लीला जात असल्याचे समजताच ते सर्व भाविक रविवारी नागपुरात उतरले. सकाळी आलेल्या एर्नाकुलम-दानापूर एक्स्प्रेसमध्ये बसण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. परंतु ८० पैकी ५२ प्रवाशांनाच गाडीत जागा मिळाली. उर्वरित २८ प्रवाशांना नागपुरातच थांबावे लागले. यावेळी नातेवाईक आणि कुटुंबीयांची ताटातूट झाली. नागपुरात थांबलेल्या २८ प्रवाशांनी संपूर्ण रात्र स्टेशनवरच काढली. आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. यात बहुतांश ज्येष्ठ नागरिक होते. या भाविकांची रेल्वे प्रशासनाने आणि प्रसारमाध्यमांनी दखल घेतली. दुपारी २ नंतर रेल्वे प्रशासनाने खासगी वाहतूक एजन्सीसोबत बोलणे करून या भाविकांसाठी खासगी वाहनाची व्यवस्था करून दिली. त्यानंतर हे भाविक आपापल्या गावाकडे रवाना झाल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक तथा जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी