शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलीय नेहा; प्रत्यारोपणासाठी हवेत तब्बल ५५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:40 IST

नेहा साळुंके. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वप्नाळू मुलगी. बी-कॉमनंतर उच्च ध्येय गाठायच्या उद्देशाने मोठ्या आत्मविश्वासासह पुढे निघाली खरी, पण शरीराने दगा दिला. हृदय आणि फुप्फुस निकामी झाले.

नागपूर : नेहा साळुंके. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वप्नाळू मुलगी. बी-कॉमनंतर उच्च ध्येय गाठायच्या उद्देशाने मोठ्या आत्मविश्वासासह पुढे निघाली खरी, पण शरीराने दगा दिला. हृदय आणि फुप्फुस निकामी झाले. परिणामी, नेहा पल्मोनरी हायपर टेन्शन या आजाराच्या विळख्यात सापडलीय. डॉक्टर म्हणतात, प्रत्यारोपण हाच अखेरचा पर्याय, पण त्यासाठी तब्बल ५५ लाखांचा खर्च समोर आव्हान बनून उभा ठाकलाय. मोठे ध्येय बाळगणारी स्वप्नाळू नेहा जीवन-मृत्यूच्या संघर्षात अडकलीय. एवढी प्रचंड रक्कम खर्च करणे नेहाच्या कुटुंबीयांसाठी अशक्य गोष्ट आहे. एक पर्याय आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सढळ हाताने मदत केली, तर नेहा व तिच्या स्वप्नांनाही जीवनदान मिळू शकते.पुण्यात राहणारी नेहा अतिशय पॉझिटिव्ह अ‍ॅटिट्यूड ठेवणारी मुलगी. तिला जडलेल्या या जीवघेण्या आजारामुळे तिचे कुटुंब पुरते कोलमडलेच होते. मात्र, नेहानेच तिच्या सकारात्मक विचारातून कुटुंबालाच धीर दिला आहे. हृदय आणि फुप्फुस निकामी झाल्याचे माहीत असूनही जगण्याची तिची ऊर्मी कुटुंबाला बळ देत आहे. नेहा बीकॉम झाली, तेव्हा सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून होती. नेहाचे वडील सुरेश साळुंखे पुण्यात लेबर विभागात कर्मचारी आहेत. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. काटकसर करीत करावा लागणारा संघर्ष या कुटुंबाच्याही वाट्याला आला आहे.दीड वर्षांपूर्वी वर्गात असताना अचानक नेहाचा श्वास भरून आला. तपासणी केली, तेव्हा हृदयात पाणी जमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. औषधोपचार करण्यात आले. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वातावरणात बदल झाला, तसा नेहाला परत तोच त्रास सुरू झाला. पुन्हा तपासणी केली, तेव्हा तिचे हृदय काम करण्याच्या स्थितीतच राहिले नसल्याचे व फुप्फुसही शरीराची साथ सोडत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अशातच चेन्नई येथे प्रत्यारोपण करून याच आजारातून सुखरूप बाहेर आलेल्या साताºयाची कोमल या मुलीबाबत माहिती मिळाली.नेहाने प्रत्यक्ष या मुलीसोबत संपर्क साधल्यानंतर साळुंके कुटुंबाला आशेचा किरण मिळाला. नेहाला चेन्नईच्या ग्लेनेगल ग्लोबल सिटी या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी १२ तासांचे आॅपरेशन होईल व त्यानंतर २१ दिवस आयसीयू व पुन्हा दोन महिने रुग्णालयातच राहावे लागणार आहे. नेहाच्या उपचारासाठी तिचे आई आणि वडील चेन्नई येथे भाड्याने खोली करून राहात आहेत.सध्या प्रत्यारोपणासाठी मॅच होणारे हृदय आणि लंग्सची शोधाशोध केली जात आहे. प्रत्यक्ष आॅपरेशन झाल्यानंतर आणखी तीन महिने तेथेच काढावे लागणार आहेत. गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलमध्ये उपचार आणि महागड्या चाचण्यांमध्ये ६ लाख रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी वडील सुरेश साळुंके यांनी सर्वस्व पणाला लावले आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम गोळा करणे या मध्यमवर्गीय बापालाही कठीण जात आहे. त्यामुळे नेहाला वाचविण्यासाठी मदतीची नितांत गरज आहे.समाजातील संवेदनशील दानदात्यांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याची हाक कुटुंबाने दिली आहे. नेहाला वाचविण्यासाठी ज्या दानदात्यांना मदत करायची असेल, त्यांनी नेहा सुरेश साळुंके यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या ०३२१०१०१००२२ या खात्यावर मदत राशी जमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. बँकेचा आयएफएससी कोड- आयसीआयसी ००००३२१ (आयसीआयसी बँक, चिंचवड) असा आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल