शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा संप चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:29 IST

एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांनी केली दोन खासगी बसेसची तोडफोड : विभागाला ७० लाखाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसºया दिवशी हंसा ट्रॅव्हल्सच्या दोन बसेसच्या काचा फोडून एसटी कर्मचाºयांनी हवा सोडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. संपाच्या दुसरा दिवस अखेर नागपूर विभागाला तब्बल ७० लाखाचा फटका बसला.एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे गणेशपेठ बसस्थानकावर दिवसभर शांतता होती. कर्मचाºयांनी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच बस आडव्या लावल्या होत्या. आगारात उभ्या असलेल्या बसेसच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. संपाबाबत पुढे काय होणार याबाबत कर्मचारी चर्चा करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाºयांच्या संपामुळे दिवाळीत प्रवाशांच्या सुविधेसाठी हंसा ट्रॅव्हल्सतर्फे ७०-८० बसेस विविध मार्गावर चालविण्यात येत आहेत.यातील एम. एच. ३१, एफ. सी. ०३८२ ही बस रामटेकवरून येत असताना एसटी कर्मचाºयांनी या बसला मनसर टोल नाक्याजवळ थांबवून बसच्या टायरमधील हवा सोडली. त्यामुळे मार्गातील वाहतूक विस्कळीत झाली. तर बस क्रमांक एम. एच. ३१, सी. ए. ६२४४ मनसर-आमडीफाटाजवळ थांबवून त्याची विंडशिल्ड तोडुन एअर प्रेशर लिक केले. या दोन्ही प्रकरणाची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.प्रवाशांच्या हितासाठी चालवित आहोत बसेसहंसा ट्रॅव्हल्सचे संचालक दिलीप छाजेड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे निर्देश आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर हंसा ट्रॅव्हल्सच्या ७० ते ८० बसेस प्रवाशांसाठी चालविण्यात येत आहेत.या बसेसमध्ये एसटी महामंडळाचे दरपत्रकही लावण्यात आले आहे. प्रवाशांच्या हितासाठी करण्यात येणाºया या सेवेच्या विरोधात संप करणाºया एसटी कर्मचाºयांनी पाऊल उचलून बसेसची हवा सोडली. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली असून पोलिसांची सुरक्षा पुरविण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवाशांची गैरसोयएसटी कर्मचाºयांच्या संपाच्या दुसºया दिवशी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एसटीच्या बसेस बंद असल्यामुळे अनेकांनी आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक प्रवाशांनी खासगी बसेसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यात खासगी बसेसकडूनही अधिक शुल्क आकारण्यात आल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली. खासगी बसेस ग्रामीण भागात जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना संपाचा अधिक फटका बसला.