चंद्रपूर : गेल्या एक महिन्यापासून पोलीस दादांवरील बंदोबस्ताचे ओझे गांद्यावरुन उतरलेले नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना मानसीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. २९ आॅगस्टला गणरायाची स्थापना झाली. १० ते १२ दिवस चाललेल्या गणेशोत्सवात पोलीस दादांना खडा पहारा द्यावा लागला. त्यानंतर दुर्गोत्सव व विधानसभा निवडणूक आल्याने सतत बंदोबस्तात तैणात राहावे लागले आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने दुर्गम भागात तगडा बंदोबस्त लावला होता. त्यामुळे जवानांना कुटुंबापासून दूर जाऊन राहावे लागले. निवडणूक शांततेत पार पडली असली तरी अद्याप मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे अद्यापही अनेक पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार असून त्यानंतरच पोलीसांना विश्रांती मिळणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर कायम
By admin | Updated: October 18, 2014 01:15 IST