सुशांत अशोकराव थुल (रा. मोतीबाग) तसेच अफसर अली शोहरत अली अशी या दोघांची नावे असून आज पहाटे २.१५ च्या सुमारास वैशाली नगरातील हनुमान सोसायटी गार्डनजवळ ते अंधारात दडून होते. गस्तीवरील पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लोखंडी रॉड, पेचकस तसेच घरफोडीचे साहित्य आणि ॲक्टिव्हा दुचाकी असा ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी सुशांत थुल हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर पाचपावली, तहसील, जरीपटका, सीताबर्डी, गणेशपेठ पोलीस ठाण्यात वेगवेगळे १४ गुन्हे दाखल आहेत.
---