शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

कडाक्याचे ऊन अन् छत हिरावले

By admin | Updated: May 22, 2015 02:45 IST

एकीकडे उन्हामुळे नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे बंद केले असताना दुसरीकडे लकडगंज परिसरातील घासबजार झोपडपट्टीवासीयांचे डोक्यावरचे छत महापालिकेने हिरावले.

मनपाने तोडली घासबजार झोपडपट्टी : १५० संसार उघड्यावरनागपूर : ‘मे हीट’ने जोर धरला आहे. सूर्य आग ओकतो आहे. पारा ४७ अंशावर पोहोचला आहे. एकीकडे उन्हामुळे नागरिकांनी दिवसभर घराबाहेर पडणे बंद केले असताना दुसरीकडे लकडगंज परिसरातील घासबजार झोपडपट्टीवासीयांचे डोक्यावरचे छत महापालिकेने हिरावले. गुरुवारी भरदुपारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने येथील तब्बल १५० झोपड्या तोडल्या. त्यामुळे सर्वांचे संसार उघड्यावर आले. झोपडपट्टीवासीयांना उन्हाचे चटके सहन करीत आपल्या सामानाची आवराआवर करावी लागली. एवढ्या कडक उन्हात डोक्यावरचे छत गेले असताना आता विसावा कुठे घ्यायचा, असा सवाल या झोपडपट्टीवासीयांनी केला आहे. गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास महापालिकेचे पथक या झोपडपट्टीत पोहोचले व एकाएक बुलडोझरने झोपड्या तोडण्यास सुरुवात झाली. नागरिक झोपड्या सोडण्यास तयार नव्हते. त्यांनी तीव्र विरोध केला. मात्र, पोलीस बळाचा वापर करून झोपडीधारकांना बाहेर काढण्यात आले व झोपड्यांवर बुलडोझर चालविण्यात आला. काही झोपडीधारकांना तर झोपडीतील सामान बाहेर काढण्यासाठीही वेळ मिळाला नाही. संबंधित झोपडपट्टी ५० वर्षांपूर्वीची असल्याचा येथील रहिवाशांचा दावा आहे. अनेकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आहे. ही सर्व कागदपत्रे दाखवूनही पथकाने कारवाई केली. याचा नागरिकांनी निषेध केला. या वेळी पथकाने झोपडपट्टीला लागून असलेले एक धार्मिक स्थळ तोडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. कारवाईदरम्यान झोपडीधारकांमध्ये एकच धावपळ सुरू होती. लहान मुलांना झाडाखाली बसवून अनेक जण भरउन्हात आपल्या सामानांची जमवाजमव करीत होते. तुटलेल्या झोपडीचे सामान गोळा करीत होते. म्हाताऱ्या नागरिकांनी झाडाच्या सावलीचा आधार घेतला. महिलांची पाण्यासाठी धावाधाव सुरू होती. डोक्यावरील छत गेल्यामुळे महिलांसह पुरुषांच्या डोळ्यातही अश्रू होते. आता एवढ्या उन्हात आम्ही कुठे राहायचे, असा सवाल ते हुंदके देत करीत होते. (प्रतिनिधी)झोपडपट्टी वसलेली संबंधित जागा महापालिकेची असल्याचा दावा लकडगंज झोनच्या अधिकाऱ्यांनी केला. महापालिकेच्या या मैदानावर झोपडीधारकांना अनधिकृत घरे बांधून नंतर ते स्थायी करून घ्यायचे आहे. दोन वर्षांपूर्वी येथील अतिक्रमण हटविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा झोपड्या बांधण्यात आल्या, असे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.