शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चाकूचा धाक : पतसंस्थेची १२ लाखांची रोकड लुटली

By admin | Updated: June 30, 2017 14:48 IST

सहकारी पतसंस्थेची १२ लाखांची रोकड संचालकांच्या ताब्यातून भरदिवसा हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता नागपुरातील कळमना भागात घडली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सहकारी पतसंस्थेची १२ लाखांची रोकड संचालकांच्या ताब्यातून भरदिवसा हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजता नागपुरातील कळमना भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला. मात्र, १८ तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पोलिसांच्या हाती अद्याप काही लागलेले नाही. कळमन्याच्या डिप्टी सिग्नल परिसरात छत्तीसगड अर्बन क्रेडिट को-आॅपरेटीव्ह सोसायटी आहे. विपतराम रामप्रसाद मानकर (वय ७०) हे या सस्थेचे संचालक आहेत. संस्थेत जमा झालेली १२ लाखांची रोकड एका बॅगमध्ये ठेवून मानकर आणि त्यांच्या सुदर्शन नामक एका सहका-याने ती बॅग अ‍ॅक्टीव्हाच्या पायदानावर ठेवली. त्यानंतर ते कळमना मार्केटकडे गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजता निघाले. त्यांना ही रोकड सारस्वत बँकेच्या कळमना मार्केट शाखेत जमा करायची होती. चिखली पूल ते चिखली चौक या रस्त्यावर दयालू मौर्य कॉम्प्लेक्ससमोर अचानक एक पल्सर त्यांना आडवी आली. पल्सरवर बसलेल्या तीन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून मानकर यांच्या ताब्यातील १२ लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. मानकर यांच्या तक्रारीनुसार केवळ दोन ते चार मिनिटात हा प्रकार घडला. मानकर आणि त्यांच्या सोबतच्या सुदर्शन नामक कर्मचा-याने आरडाओरड केली. मात्र, कुणाला काही कळेपर्यंत लुटारू पळून गेले होते. मानकर यांनी हा प्रकार आपल्या अन्य सहका-यांना कळविल्यानंतर सायंकाळी कळमना ठाण्यात धाव घेतली. कळमन्याचे पोलीस उपनिरीक्षक पी. रणदीवे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. अत्यंत वर्दळीच्या या भागात आजुबाजुच्यांना या घटनेविषयी आणि लुटारूंविषयी पोलिसांनी विचारपूस केली. मात्र, मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणात कोणताच धागा पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे नंतर या प्रकरणात लुटमारीचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ---सीसीटीव्हीचा आधार एक वृद्ध संचालक १२ लाखांसारखी मोठी रोकड कोणतीही सुरक्षा व्यवस्था सोबत न घेता दुचाकीने दीर्घ अंतरावर घेऊन जातो, हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या लुटमारीतील तथ्य तपासण्यासाठी पोलिसांना आता सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागत आहे. पत संस्थेतील आणि घटनास्थळापर्यंतच्या मार्गावरचे सर्व सीसीटीव्ही पोलीस तपासत आहे. त्यातून लुटमारीचा अन् आरोपीचा खुलासा होण्याची पोलिसांना आशा आहे.