शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे बँकांचे २८०० कोटींचे व्यवहार ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:08 IST

नागपूर : केंद्र शासनाचे बँकविरोधी धोरण आणि दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोनदिवसीय संपाला सुरुवात केली ...

नागपूर : केंद्र शासनाचे बँकविरोधी धोरण आणि दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोनदिवसीय संपाला सुरुवात केली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी नागपूर जिल्ह्यात २८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे बँक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट करून संपाचे समर्थन केले.

संपात नागपूर जिल्ह्यातील विविध बँकांच्या ३३० पेक्षा अधिक शाखांमधील १२५०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला, असे ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव जयवंत गुर्वे यांनी सांगितले. संपात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली नऊ संघटनांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडिया आणि सिव्हिल लाईन्स येथील अलाहाबाद बँकेसमोर खासगीकरणाचा विरोध केला.

यावेळी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी राकेश बंगाले, वीरेंद्र गेडाम, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स नागपूर चॅप्टरचे सहसंयोजक सुरेश बोभाटे, ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव जयवंत गुर्वे उपस्थित होते. कामगार नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासगीकरणाच्या मुद्द्‌यावर एकजूट राखण्याचे आवाहन केले.

दोन दिवसांच्या संपात सहकारी आणि खासगी बँका सहभागी झाल्या नसून लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन, धरणे आंदोलन न करता, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट केल्याचे विदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे व्यवस्थापकीय सचिव सुरेश चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवार, रविवार बँका बंद असल्यामुळे आणि सोमवार, मंगळवार संप असल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील एटीएम रिकामी झाली.

१७ व १८ रोजी विमा कर्मचारी संपावर

- दोन दिवसांच्या या संपानंतर १७ मार्चला जनरल इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच १८ मार्चला एलआयसीचे कर्मचारी आणि अधिकारीही एलआयसी, जीआयसीच्या खासगीकरणाविरुद्ध संप पुकारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

..............

असा राहिला संप...

- जिल्ह्यातील ३३० शाखांतील १२५०० कर्मचारी संपावर

- बँकिंग क्षेत्रातील ९ संघटनांचा संपात समावेश

- २८०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

- कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला केला विरोध

- सहकारी, खासगी बँकांचा संपात सहभाग नाही

- लॉकडाऊनमुळे बँक कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन, धरणे आंदोलन टाळले

- सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला संपाला पाठिंबा

- संपामुळे शहराच्या बहुतांश भागातील एटीएम झाली रिकामी.

............