लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दुसऱ्या टप्प्यातील काेराेना संक्रमणाला ‘ब्रेक’ लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ७ मार्चपर्यंत आठवड्यातील दाेन दिवस अत्यावश्यक वस्तूंची विक्री वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले हाेते. त्याअनुषंगाने कामठी शहरातील व्यापारी व दुकानदारांनी दुसऱ्या आठवड्यातही सकारात्मक प्रतिसाद देत शनिवारी (दि. ६) कडकडीत बंद पाळला हाेता.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये तालुका प्रशासनाने ७ मार्च पर्यंत शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा व वस्तूंच्या विक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिकांना केल्या हाेत्या. त्याअनुषंगाने कामठी शहरातील व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी मागील आठवड्यात शनिवार व रविवारी त्यांची दुकाने पूर्णपणे बंद ठेवली हाेती. त्यांनी याच आदेशाचे पालन करीत चालू आठवड्यातही त्यांची दुकाने शनिवारी बंद ठेवली हाेती. परिणामी, शहरात औषधी, किराणा, दूध व भाजीपाला विक्रीची दुकाने तसेच पेट्राेल पंप आणि घरगुती गॅस सिलिंडर वितरण सुरू हाेते.
स्थानिक नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळल्याने तसेच दिवसभर बहुतांश दुकाने बंद असल्याने कामठी शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवर शुकशुकाट हाेता. काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली असून, तहसीलदार अरिवंद हिंगे, कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे, कामठी (नवीन)चे ठाणेदार संजय मेंढे, कामठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बाेरकर परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेते. दुसरीकडे, नागरिकांनी संयम बाळगत शासनाने सुचविलेल्या काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.