शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करणारे, खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी

गिरीश बापट यांचे आश्वासन : अ.भा. ग्राहक पंचायतचे निवेदननागपूर : रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवठा करणारे, खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन अन्न औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी अ.भा. ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाला दिले.२९ समस्यांची मंत्र्यांना यादीरेशन दुकानांमध्ये कार्डावर नागरिकांना मिळणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून चांगल्या दर्जाचे धान्य खुल्या बाजारात विकले जात आहे. खाद्यपदार्थ आणि दुधामध्ये होणारी जीवघेणी भेसळ, बाजारात विकले जाणारे रासायनिक दूध नागरिकांच्या जीवास हानी करणारे असल्याची बाब अ.भा. ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. यावर जातीने लक्ष घालून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाने मंत्र्यांची रविभवन येथे अलीकडेच भेट घेऊन त्यांना २९ समस्यांची यादी दिली. स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन करा भेसळ रोखण्यासाठी सर्व प्रकारची तपासणी त्वरित होण्याच्या दृष्टीने सर्व सोयींनी युक्त एक स्वतंत्र प्रयोगशाळा नागपुरात सुरू करण्यात यावी, बाजारात मिळणारे रासायनिक दूध तसेच दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रात गाई-म्हशींद्वारे शुद्ध दूध मिळण्याचे प्रमाण फार कमी असतानासुद्धा लाखो नागरिकांना दुधाचा मुबलक पुरवठा होतो काय, अशी शंका येत असून यामध्ये रसायनामध्ये दूध बनवून मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची शंका पंचायतने मंत्र्यांसमोर मांडली. याशिवाय खाद्यपदार्थ, तेलामधील भेसळ, पेट्रोल, डिझेलमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.(प्रतिनिधी)निकालाची प्रत ९० दिवसांत मिळावीजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये तक्रार करण्यासाठी ३५ अटी लादल्या असून त्या त्वरित रद्द करण्यात याव्या, तक्रारकर्त्यांना न्याय लवकरच मिळावा, नियमाप्रमाणे ९० दिवसात निकालाची प्रत ग्राहकाला मिळावी, अशी मागणी केली. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये अपील करणाऱ्यांना तीन ते चार वर्षे न्यायच मिळत नाही, ही शोकांतिका असून त्वरित न्याय मिळावा, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. शिष्टमंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे, विदर्भ प्रांत सचिव संजय धर्माधिकारी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्या अ‍ॅड. गौरी चांद्रायण, शहर सचिव उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, शहर अध्यक्ष अशोक पात्रीकर, संपाद आपटे, प्रसिद्धी प्रमुख गणेश शिरोळे, संपर्क प्रमुख विनोद देशमुख, सतीश शर्मा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.