शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्यांना प्रगतीची उभारी

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

गरीब व होतकरू विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या खालावले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व सायकल या दोन्ही गोष्टी मौलिकच आहेत. अशांच्या मदतीला मैत्री परिवार संस्था धावून आली आहे.

२०० विद्यार्थी दत्तक तर १०० सायकलींचे वाटप : मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम नागपूर : गरीब व होतकरू विद्यार्थी जे आर्थिकदृष्ट्या खालावले आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व सायकल या दोन्ही गोष्टी मौलिकच आहेत. अशांच्या मदतीला मैत्री परिवार संस्था धावून आली आहे. क्रांतिदिनाच्या निमित्ताने शनिवारी ५० शाळांमधील २०० शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक साहाय्यार्थ दत्तक घेण्याचा व १०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्याचा अनोखा उपक्र म राबविला आणि विद्यार्थ्यांना प्रगतीची उभारी दिली.प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे सचिव रामभाऊ खांडवे तर मंचावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, संजय नखाते, डॉ. पिनाक दंदे, अरविंद गिरी उपस्थित होते. यावेळी खांडवे यांचे स्वागत सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. खांडवे म्हणाले, विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि मैत्री परिवार ते कर्तव्य पार पाडत आले आहे. देशाचे भवितव्य घडविण्याची ही ‘मैत्री’ उज्ज्वल भविष्याकडे नेणारी आहे. शिक्षण हीच सर्वप्रकारच्या बदलाची जननी आहे. त्याचे महत्त्व या संस्थेने ओळखले आहे. विद्यार्थ्यांना उभारी देणाऱ्या या उपक्रमात सातत्य ठेवा, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक संजय नखाते यांनी केले. ते म्हणाले, मैत्री परिवार संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी शहरातील १०० शाळांमधून संस्कार, करिअर, आरोग्य तपासणी व वाहतूक नियमांवरील जनजागृती कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून सुदृढ समाजनिर्मितीचे कार्य हाती घेतले जाईल. सोबतच घरोघरी जाऊन रद्दी गोळा करण्याच्या उपक्रमातून कॅन्सर, हृदय व थॅलेसेमियाच्या अत्यंत गरजू रुग्णांना औषधोपचार केला जात आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.(प्रतिनिधी)