शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सोले यांना संघटनांचे बळ

By admin | Updated: June 18, 2014 01:31 IST

नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप-शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांना दलित संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. विविध संघटनांच्या बळाने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

नागपूर पदवीधर मतदार संघ : प्रचारात आघाडीनागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघाचे भाजप-शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार प्रा. अनिल सोले यांना दलित संघटनांनी समर्थन जाहीर केले आहे. विविध संघटनांच्या बळाने त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाचे भाजपा-शिवसेना, रिपाइं महायुतीचे उमेदवार अनिल सोले यांना भारतीय दलित पँथरने समर्थन जाहीर केले असल्याची माहिती विदर्भप्रमुख सिद्धार्थ कुर्वे यांनी दिली. १५ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यात पार पडलेल्या कार्यकारिणी बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री पद्मशेष (नागद्वार) सेवा मंडळाने सोले यांना समर्थन जाहीर केले. या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव महाकाळकर व पदाधिकाऱ्यांनी सोले यांना जाहीर समर्थनाचे पत्र सादर केले. यावेळी रामकृष्ण गुल्हाने, गोविंदराव गुरमुळे, उत्तमराव देशमुख, महादेव श्रीखंडे आदींची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत अनिल सोले यांना समर्थन जाहीर करण्यात आले. बैठकीला जिल्हाप्रमुख प्रमोद लोणारे, अध्यक्ष बंडू पोटे, कार्याध्यक्ष प्रमोद वानखेडे, महामंत्री दिलीप चरपे, कोषाध्यक्ष टेमराज माले, उपाध्यक्ष रेखा कडू, खुशाल कापसे, भूपेश चौहान, इकबाल शेख, यशवंत राऊत, राजकुमार पचारे, सुभाष घवघवे, प्रकाश वैरागडे, ओंकार पाटील, वसंत गोमासे, वंदना खसाले, नरेंद्र बोडाले, सुरेश कुथे, नरेंद्र किलकर, योगेश भुरसे, मोरेश्वर डहाले, रेखा डाहके, राजू बोचरे, राजू यावलकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.(प्रतिनिधी)