शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

विदर्भात बसपाचे खाते उघडण्याची रणनीती तयार; ९ लोकसभा, विदर्भात २४ विधानसभा मतदारसंघ लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 20:52 IST

Nagpur News विदर्भातून खाते उघडण्यासाठी बसपाने पूर्ण रणनीतीसुद्धा आखली आहे. तेव्हा ‘वन बूथ टेन यूथ’ या फार्म्युल्यानुसार कामाला लागा, असे आवाहन बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांनी येथे केले आहे.

नागपूर : महाराष्ट्र ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. बसपाला यंदा निवडणुकीत चांगली संधी आहे. विदर्भातून खाते उघडण्यासाठी बसपाने पूर्ण रणनीतीसुद्धा आखली आहे. तेव्हा ‘वन बूथ टेन यूथ’ या फार्म्युल्यानुसार कामाला लागा, असे आवाहन बसपाचे केंद्रीय समन्वयक व महाराष्ट्राचे मुख्य प्रभारी राज्यसभा खासदार रामजी गौतम यांनी येथे केले आहे.

रविभवन येथे बुधवारी बसपाच्या महाराष्ट्र स्तरावरील मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी बसपाचे दुसरे केंद्रीय समन्वयक भीम राजभवन, मनीष आनंद, प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने प्रामुख्याने उपस्थित होते.

रामजी गौतम म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष तुटले असून, यापुढे भाजपसुद्धा फुटणार आहे. अशा परिस्थितीत फुले-शाहू-आंबेडकरी मिशन चालवणाऱ्या बसपाकडे महाराष्ट्रातील नागरिक आशेने बघत आहेत. बसपाने निवडणुकीची पूर्ण रणनीती तयार केली आहे. राज्यात ९ लोकसभा व विदर्भात २४ विधानसभा मतदारसंघ लक्ष्य ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी लवकरच राज्यभरात विधानसभा स्तरावर संकल्प यात्रा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुनील डोंगरे यांनी विदर्भ, मनीष कावळे यांनी मराठवाडा आणि डॉ प्रशांत इंगळे यांनी मुंबई विभागातील कार्याचा आढावा सादर केला. बैठकीला राज्यातील सर्व प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रंजनाताई ढोरे, पृथ्वीराज शेंडे, राजीव भांगे, विजयकुमार डहाट, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, उत्तम शेवडे, अभिलेश वाहाने, शादाब खान, ओपुल तानगाडगे, सुरेखा डोंगरे, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र गवई यांनी केले. नागोराव जयकर यांनी आभार मानले.

टॅग्स :BSP District President Avinash Wankhedeबसपा जिल्हाध्यक्ष अविनाश वानखडे