शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सडकछाप मजनुच्या त्रासाला कंटाळून महिलेने विष घेतले

By admin | Updated: June 26, 2017 22:51 IST

गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणा-या सडकछाप मजनुच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षीकेने (वय ३३) विष प्राशन केले. तिची

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २६ - गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणा-या सडकछाप मजनुच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षीकेने (वय ३३) विष प्राशन केले. तिची प्रकृती गंभीर असून, या घटनेमुळे सक्करदरा परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या पतीकडून तक्रार दाखल होतताच पोलिसांनी या प्रकरणी सौरभ प्रकाश ढोले (वय २६) याला अटक केली आहे. पीडित शिक्षीका आणि आरोपी ढोले एकमेकांशेजारी राहतात. पीडितेचा पती खासगी नोकरी करतो. शेजारी म्हणून सहज बोलचाल करणा-या शिक्षीकेचा गेल्या आठ महिन्यांपासून आरोपी सौरभने पिच्छा पुरविणे सुरू केले आहे. तिचा पाठलाग करणे, सलगी साधण्याचे प्रयत्न करणे, हातवारे करणे, मोबाईलवर वारंवार मेसेज करणे, असे प्रकार सुरू झाल्यामुळे शिक्षीका त्रस्त झाली. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर सौरभला शिक्षीकेच्या पतीने एकदा समजावूनही सांगितले. मात्र तो ऐकला नाही. बदनामी होईल, या धाकाने दाम्पत्य गप्प बसल्यामुळे आरोपी निर्ढावला. त्याचा त्रास दिवसागणिक वाढतच चालल्यामुळे प्रचंड दडपणात आलेल्या शिक्षीकेने रविवारी दुपारी विष घेतले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सौरभच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने (वय ४३) सक्करदरा ठाण्यात नोंदवली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक डेहनकर यांनी आरोपी सौरभ प्रकाश ढोले याच्याविरूध्द कलम ३५४ (ड) अन्वये गुन्हा नोंदविला. महिलेची मृत्यूशी झुंजया प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विष घेणा-या शिक्षीकेची प्रकृती गंभीर असून, सक्करद-यातील एका खासगी रुग्णालयात तिची मृत्यूशी झूंज सुरू आहे. डॉक्टरांकडून परवानगी मिळाली नसल्यामुळे पोलिसांना तिचे बयानही नोंदवता आले नाही. आरोपी सौरभ रिकामटेककडा असून, त्याला अटक करण्यात आली आहे.