शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पेंचमध्ये ‘एसटीपीएफ’च्या बदलीचे वादळ

By admin | Updated: March 4, 2017 02:12 IST

सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे.

एनटीसीएचे नियम धाब्यावर : पेंचमधून थेट पुणे वनवृत्तात बदली जीवन रामावत   नागपूर सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात विशेष व्याघ्र संरक्षण दलातील (एसटीपीएफ) जवानाच्या नियमबाह्य बदलीवरून प्रचंड वादळ उठले आहे. नागपूर वन विभागाने येथील एका एसटीपीएफ जवानाची राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) सर्व नियम धाब्यावर बसवून थेट पुणे वनवृत्तात बदली केल्याची घटना पुढे आली आहे. विशेष म्हणजे, एनटीसीएच्या गाईडलाईननुसार कोणत्याही एसटीपीएफ जवानाची वयाच्या ४० वर्षापर्यंत दुसरीकडे बदली करता येत नाही. मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आणि राजकीय दबावात ही बदली झाली असल्याचे बोलले जात आहे. अनिल वामन राठोड, असे त्या बदली झालेल्या जवानाचे नाव आहे. जंगलातील वाघांच्या संरक्षणासाठी एक स्वतंत्र फौज असावी, त्यांचा शिकाऱ्यांवर थेट वॉच असावा आणि देशातील वाघांची संख्या वाढावी, या हेतूने ‘एसटीपीएफ’ची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार २०१२ मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पासाठी ८० लोकांची एसटीपीएफमध्ये नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून एसटीपीएफची फौज पेंच व्याघ्र प्रकल्पात तैनात आहेत. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी अचानक झालेल्या राठोड यांच्या बदलीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, पेंचमधील एसटीपीएफ नेहमीच अन्यायाचा सामना करीत आले आहे. २४ तास जंगलात तैनात असलेल्या या जवानांना कधीच आवश्यक सोई-सुविधा मिळाल्या नाहीत. एवढेच नव्हे, तर त्यांची केवळ व्याघ्र संरक्षणासाठी नियुक्ती झाली असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या कामांचा बोजा टाकण्यात आला आहे. यातच उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या गेटवर चक्क काही एसटीपीएफ जवानांना पर्यटकांकडून तिकीट फाडण्यासाठी काऊंटरवर बसविण्यात आले होते. मात्र असे असताना यामधील सर्व तरुण नवीन असल्याने आतापर्यंत ते सर्व मुकाटपणे अन्याय सहन करीत होते, परंतु आता त्यांनी आवाज उठविला असून, जर एका एसटीपीएफ जवानाची पुणे वनवृत्तात बदली होत असेल, तर आमची का नाही? असा प्रश्न उपस्थित करून पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाकडे आपल्या बदल्यांचे अर्ज सादर केले आहेत. एसटीपीएफ जवानांच्या या आक्रमक भूमिकेने पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालय चांगलेच हादरले आहे. शिवाय एनटीसीएच्या नियमांना न जुमानता राठोड यांच्या बदलीसाठी शिफारस करणारा वन अधिकारी कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘एसटीपीएफ’च्या ट्रेनिंगचा बोजवारा माहिती सूत्रानुसार पेंचमधील एसटीपीएफ जवानांच्या प्रशिक्षणाचा (ट्रेनिंगचा) बोजवारा वाजला आहे. नियमानुसार या सर्व एसटीपीएफ जवानांना प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण (ट्रेनिंग) देणे अनिवार्य आहे. मात्र पेंचमधील एसटीपीएफ जवानांचे मागील तीन वर्षांत केवळ एक ट्रेनिंग झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मग ही फौज बहेलियासारख्या सराईत शिकाऱ्यांशी दोन हात कसे करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोबतच या जवानांचे नियमानुसार प्रत्येक तीन महिन्यात प्रशिक्षण का झाले नाही, आणि त्यासाठी कोण जबाबदार आहेत, याची पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमचा विश्वासघात! उप वनसंरक्षक, नागपूर कार्यालयाने २०१२ मध्ये या सर्व ८० तरुणांची ‘वनरक्षक’ म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना नियुक्ती आदेशसुद्धा वनरक्षक म्हणूनच देण्यात आले आहे. परंतु रुजू झाल्यानंतर त्यांना विशेष व्याघ्र संरक्षण दलात (एसटीपीएफ) दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, चंद्रपूर, मेळघाट आणि नवेगाव-नागझीरा येथील एसटीपीएफच्या पदभरतीसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्घ करून, तेथील तरुणांना वनरक्षक (विशेष व्याघ्र संरक्षण दल) असेच नियुक्ती पत्रसुद्धा देण्यात आले आहे. मात्र पेंचमधील या तरुणांच्या नियुक्तीसाठी तशाप्रकारची कोणतीही जाहिरात देण्यात आलेली नव्हती, तर त्यांची वनरक्षकांच्या पदभरतीतून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पेंचमधील एसटीपीएफ जवान हा आमच्यावर अन्याय असून, वन विभागाने आमचा विश्वासघात केला असल्याचा संताप व्यक्त करीत आहे. सोबतच अनेकांनी त्याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.