शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

वादळ ‘वार’

By admin | Updated: May 29, 2017 02:48 IST

दोन महिन्यापासून उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन महिन्यापासून उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना रविवारी सायंकाळच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले. शहरात विविध भागात ३५ ते ४० झाडे पडली. मोठमोठे होर्डिंग उडाले. वीजतारा तुटल्या तसेच वीज खांब कोसळल्याने शहराच्या बहुसंख्य भागातील वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे अंधारचे साम्राज्य होते. सीए रोडच्या बाजूच्या ट्रान्सफार्मरला आग लागली. वादळामुळे नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या नवेगाव खैरी पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा बंद पडला. यामुळे सोमवारी शहराच्या अनेक भागाला पाणी मिळणार नाही. रात्री ८.३० पर्यंत नागपूर शहरात २५.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.अर्धे शहर अंधारातरविवारी सायंकाळी आलेल्या वादळाचा स्पॅन्को नागपूर डिस्कॉम लिमिटेडच्या (एसएनडीएल) तब्बल १२ फिडरला तडाखा बसला. याशिवाय महावितरणचीसुद्धा संपूर्ण वीज यंत्रणा कोलमडून पडली होती. यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक शहर अंधारात बुडाले होते. महावितरणच्या रामदासपेठ, धंतोली व छत्रपतीनगरसह एसएनडीएलच्या अधिकार क्षेत्रातील वर्धमाननगर, इतवारी, सीए रोड, मेडिकल, सिव्हिल लाईन्स, सेमिनरी हिल्स, हजारी पहाड व वंजारीनगर परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा ठप्प झाला होता. यात एसएनडीएलचे वर्धमाननगर येथील ३३ केव्हीचे सबस्टेशन डाऊन झाले होते. याशिवाय सेमिनरी हिल्स येथील फीडरवरून हजारी पहाड परिसरात होणारा वीज पुरवठा पूर्णत: खंडित झाला होता. जोराच्या वादळामुळे अनेक ठिकाणी सर्व्हिस केबल तुटले आहेत. त्याचाही वीज ग्राहकांना फटका सहन करावा लागला. ही विस्कळीत झालेली संपूर्ण वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी एसएनडीएलची दीडशे कर्मचाऱ्यांची फौज रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर काम करीत होती. यात त्यांना काही फिडर दुरुस्ती करण्यात यश मिळाले होते. परंतु वर्धमाननगर, मेडिकल आणि हजारी पहाड परिसरातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. वीज कोसळून तरुणाचा मृत्यूजोरात कडाडलेली वीज झाडावर कोसळल्याने त्या झाडाखाली उभ्या असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना कुही तालुक्यातील बोरी (सदाचार) शिवारात रविवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली. सचिन रामदास वाढवे (२२, रा. बोरी-सदाचार, ता. कुही) असे मृत तरुणाचे नाव आहे. सचिन बकऱ्या चारण्यासाठी बोरी (सदाचार) शिवारात गेला होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते. सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्याने तो या शिवारातील संतोष भोतमांगे यांच्या शेतातील झाडाखाली उभा राहिला. त्यातच जोरात कडाडलेली वीज थेट झाडावर कोसळली. त्यात गंभीर इजा झाल्याने त्याला लगेच मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.बालिका जखमीजोरात कडाडलेली वीज कोसळल्याने परिसरात खेळत असलेली सात वर्षीय बालिका जखमी झाली. ही घटना काटोल शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रविवारी सायंकाळी घडली. माही शेंडे (७, रा. रेल्वेस्थानक परिसर, काटोल) असे जखमी बालिकेचे नाव आहे. ती नेहमीप्रमाणे तिच्या घराच्या परिसरात खेळत होती. त्याचवेळी वादळासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जोरात कडाडलेली वीज तिच्या घराच्या परिसरात कोसळली. त्यात माहीला इजा झाली. ही बाब लक्षात येताच तिला लगेच शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून तिला सुटी दिली.