शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत काँग्रेसचा रास्ता रोको

By admin | Updated: November 3, 2016 03:31 IST

वन रॅँक वन पेन्शन (ओआरओपी) च्या मुद्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना झालेल्या अटकेचे तीव्र

राहुल गांधींच्या अटकेचे पडसाद : सीताबर्डीतील वाहतूक तासभर ठप्प नागपूर : वन रॅँक वन पेन्शन (ओआरओपी) च्या मुद्यावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना झालेल्या अटकेचे तीव्र पडसाद बुधवारी नागपुरात उमटले. शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत व्हेरायटी चौकात चक्काजाम केला. कार्यकर्त्यांनी काही स्टारबसेस व एसटी बसेस फोडण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे सीताबर्डी चौकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. आंदोलनादरम्यान पोलीस मात्र निष्प्रभ झाल्याचे दिसत होते. ओआरओपीच्या मागणीसाठी माजी सैनिक रामकिसन ग्रेवाल यांनी बुधवारी आत्महत्या केली. मृताच्या भेटीला जात असलेल्या राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तीव्र असंतोष काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पसरला. नागपुरात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, उमाकांत अग्निहोत्री यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला तसा आंदोलनाला उग्र रूप प्राप्त झाले. कार्यकर्त्यांनी वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चौकातून स्टारबस चालकाने गाडी काढण्याचा प्रयत्न करताच कार्यकर्त्यांनी गाडीवर चढून चालकाला बाहेर काढले. काहींनी गाडी फोडण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर इतर सिग्नलवरून निघणाऱ्या स्टारबस, एसटी बसेस गाड्यांनाही थांबविण्यात आले. याचवेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांशी झटापटही झाली. कार्यकर्ते या सिग्नलवरून त्या सिग्नलवर धावत जाऊन वाहतूक थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी नेते, कार्यकर्ते यांनी चौकात गोल मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. प्रधानमंत्री व भाजपा सरकारच्या विरोधात यावेळी तीव्र नारेबाजी करण्यात आली. जवळपास तासभर हे आंदोलन नाट्य सीताबर्डी चौक ात सुरू होते. या सर्व आंदोलनादरम्यान पोलीस मात्र हतबल झाल्याचे दिसून येत होते. सैरभैर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यात पोलिसांचे बळ कुचकामी ठरले. युवक काँग्रेसनेही जाळला मोदींचा पुतळा दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सीताबर्डी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळून भाजपा सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. युवक काँग्रेस शहर अध्यक्ष बंटी शेळके यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी इटर्निटी मॉलसमोर पुतळादहन व घोषणाबाजी करून सरकारचा निषेध केला. त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केली. आंदोलनात प्रशांत तन्हेरवार, रोहित खैरवार, स्वप्नील बावनकर, हेमंत कातुरे, आसीफ शेख, अथर्व पोहनकर, स्वप्निल ढोके, समीर काळे, राम पऱ्हाटकर, सौरभ शेळके आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.