शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅगिंग’च्या मानसिकतेवर वचक आणा; ‘युजीसी’चे विद्यापीठांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 11:49 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह सर्व विद्यापीठांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘रॅगिंग’संदर्भात कडक निर्देश जारी केले आहेत.

ठळक मुद्देकायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह सर्व विद्यापीठांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘रॅगिंग’संदर्भात कडक निर्देश जारी केले आहेत. महाविद्यालयांच्या शैक्षणिक विभाग, परिसर आणि वसतिगृहांमध्ये रॅगिंग होऊ नये याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आयोगाकडून करण्यात आल्या आहे. ‘रॅगिंग फ्री कॅम्पस’ करण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात आयोगाकडून कुलगुरूंना पत्रच पाठविण्यात आले आहे.उपराजधानीतील अनेक उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात रॅगिंग सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन अभ्यास, त्यांच्या भविष्याला हानी पोहोचू शकते. रॅगिंगसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा याकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्र जारी केले आहे.जर शैक्षणिक परिसरात रॅगिंगच्या घटना होत असतील तर विद्यार्थ्यांनी कुणालाही न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन या आयोगातर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठातील विभाग प्रमुख, विद्यार्थी कल्याणचे संचालक किंवा युजीसीकडे याबद्दल तक्रार करू शकतात. विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायद्याची ओळख व्हावी याकरिता माहिती देणारे पोस्टर्सदेखील तयार करण्यात यावे अशी सूचना आयोगाने केली आहे.दोषींना होणाऱ्या शिक्षामहाविद्यालयातून हकालपट्टीमेस आणि वसतिगृहात प्रवेशाला बंदीशिष्यवृत्ती थांबविणेपरीक्षेला बसण्यास अनुमती नाकारणेइतर संस्थात प्रवेशास बंदीफौजदारी कारवाई

आयोगाने विद्यापीठाला केलेल्या सूचनाशैक्षणिक विभाग, महाविद्यालय आणि वसतिगृहात रॅगिंग विरोधी दक्षता पथक स्थापन करणेशैक्षणिक परिसराच्या प्रथमदर्शनी भागात सूचनाफलक लावणे.महाविद्यालय व वसतिगृहात प्रवेशाच्या वेळी रॅगिंग करणार नाही या आशयाचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे.शैक्षणिक परिसरात रॅगिंगविरोधी जागृतीचे आयोजन करणे.विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता निबंध व भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करणे.रॅगिंग विरोधी अधिनियमाची पायमल्ली करताना आढळून आलेल्या विद्यार्थ्यावर कडक कारवाई करणे.

खरोखरच पालन होणार का?विद्यापीठ अनुदान आयोगाने जरी ‘रॅगिंग’संदर्भात कठोर कायदा केला असला तरी त्याचे महाविद्यालयांकडून खरोखरच किती प्रमाणात पालन होणार हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये ‘रॅगिंग’चे नियम केवळ कागदावरच दिसून येतात. अनेक ठिकाणी तर उगाच त्रास नको म्हणून महाविद्यालयांकडूनच विद्यार्थ्यांच्या तक्रारी घेण्याचे टाळण्यात येते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र